Saie Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saie Tamhankar:...तर तुम्ही जिंकलात, ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरने दिलं सडेतोड उत्तर

Saie Tamhankar Trolled: सई ताम्हणकर तिच्या चित्रपटांसोबत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. अनेकदा सई ताम्हणकर तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होते. नेटकरी तिला ट्रोल करत मराठी संस्कृतीचे धडे देतात.

Priya More

Saie Tamhankar Answers To Trollers:

मराठी सिनेसृष्टीची (Marathi Film Industry) बोल्ड आणि बिनधास्त गर्ल सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच सई ताम्हणकरचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. सई ताम्हणकर तिच्या चित्रपटांसोबत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. अनेकदा सई ताम्हणकर तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होते. नेटकरी तिला ट्रोल करत मराठी संस्कृतीचे धडे देतात. कितीही ट्रोल केले तरी देखील सई ताम्हणकर त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण आता सई ताम्हणकरने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

सई ताम्हणकरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिलं आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर ट्रोलिंगवर स्पष्टपणे बोलली आहे. बोल्ड फोटो आणि सीन्समुळे सईला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. यावर तिला प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना सईने सांगितले की, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि स्तुतीसह ट्रोलिंगही या प्रोफेशनचा घट्ट भाग आहे. मला असे वाटते की याकडे दुर्लक्ष करावं. एखादी व्यक्ती जेव्हा प्रसिद्ध होते. चार चौकटीच्या बाहेर काम करू पाहते. तेव्हा त्या व्यक्तीला ट्रोल केले जाते. तर कधी-कधी काहीही करत नाही म्हणून देखील ट्रोल तिला केले जाते.'

सई ताम्हणकरने पुढे सांगितले की, ट्रोलिंगचा मनावर परिणाम होते. पण ट्रोलिंगवर आपली एनर्जी खर्च न करणे हाच एक चांगला उपाय आहे. आम्ही कुणाची बहीण, मुलगी आणि ताई आहोत असे लोकं कमेंट्स करताना विचारतात. मला असे वाटते की, प्रोफेशमध्ये असताना थोडीशी गेंड्याची कातडी ठेवणं गरजेचं आहे. ट्रोलिंग करून ते तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जर तुम्ही तिकडे दुर्लक्ष करण्यात यशस्वी झालात तर तुम्ही जिंकलात.'

दरम्यान, सई ताम्हणकरचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटामध्ये सईसोबत सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. लवकरच सई ताम्हणकर 'भक्षक' या हिदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत असून सई ताम्हणकर पोलिसाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT