Sai Tamhankar And Amruta Khanvilkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar And Amruta Khanvilkar: सई आणि अमृताच्या मैत्रीत का पडली फुट ? मुलाखतीत सांगितले खास कारण...

मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर. सध्या या आपल्या चित्रपटांमुळे आणि मैत्रीवर बऱ्याच चर्चा होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Actress: मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रसिद्ध आहेत. अशा क्वचितच काही अभिनेत्री आहेत ज्या एकमेकींसोबत जास्त बोलत नाहीत. पण बऱ्याच अभिनेत्रीही चांगल्या मैत्रिणीही आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या दोन अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर. सध्या या आपल्या चित्रपटांमुळे आणि मैत्रीवर बऱ्याच चर्चा होत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी सई ताम्हणकरची ओळख आहे. सई मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. सईने आपल्या अभिनयाची सुरुवात अनेक लहान भूमिकेंपासून केली. सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या दोघींच्या मैत्रीत दुरावा आल्याचे अनेकदा बोलले जाते. नुकतेच सईने दोघींच्या मैत्रीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

सईने नुकतीच एका आर जे ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारला, 'मराठी सिनेसृष्टीत सध्या अशी चर्चा सुरू आहे की, सई आणि अमृता यांच्यात काही ठिक नाही? तुमच्या मैत्रीत दुरावा आला आहे? अमृताला ज्या भूमिकांसाठी विचारण्यात आल्यानंतर त्या भूमिका तुझ्याकडे आल्या यामुळे ती नाराज झाली आहे? असे काही प्रश्न विचारले.

या प्रश्नांवर ही तिने आपले उत्तर दिले आहेत. यावर ती बोलते, मला याबद्दल असे काहीही माहीत नाही. “पण हे असं तर होणारच ना, बऱ्याचदा एक भूमिका दोन जणांना विचारली जाते. किंवा त्याहून ही अधिक जणांना विचारले जाते. हा आपल्या कामाचा एक भाग आहे. परंतु या कारणावरुन मनात काही आढी ठेवणं मला बरोबर वाटत नाही. असं काही झालंही असेल असे मला तरी वाटत नाही”, असे सई ताम्हणकरने स्पष्ट सांगितले.

पुढे आर जे ने विचारले, तुझी आणि अमृताची कधी भेट होते का ? आणि तेव्हा सर्व काही आलबेल असतं का ? त्यावर तिने हो असे उत्तर दिले. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेवर मी अमृताला आज घरी जाऊन फोन करून विचारणार असल्याचे सईने सांगितले.

सई आणि अमृता या दोघीही चांगल्या मैत्रिणी असून त्या दोघीही बऱ्याचदा एकत्र फोटो शेअर करत असतात. त्या दोघींनी 'पाँडिचेरी' चित्रपटात एकत्र काम सुद्धा केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT