Sai Tamhankar Boyfriend News Instagram
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar Vacation Photo: सई ताम्हणकर स्पेनमध्ये नेमकी कोणाला करतेय डेट; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित

Sai Tamhankar News: गेल्या अनेक काही दिवसांपासून सोशल मीडियावर सई नेमकी कोणाला डेट करतेय सध्या अशी चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Sai Tamhankar Boyfriend News: अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते. मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयातून तिने मराठी सिनेसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. सई ताम्हणकरच्या अभिनयाचा डंका बॉलिवूडमध्येही गाजला, तिने ‘मीमी’ या चित्रपटातून आणि ‘इंडिया लॉकडाऊन’ या वेबसीरिजमधून बॉलिवूडमध्ये आणखीनच प्रसिद्ध झाली. गेल्या अनेक काही दिवसांपासून सोशल मीडियावर सई नेमकी कोणाला डेट करतेय सध्या अशी चर्चा सुरू आहे. सध्या तिचा स्पेन दौरा सुरू आहे.

आपल्या कामामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सईचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत असतं. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहणारी सई तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळेही ती अनेकदा चर्चेत असते. सई सध्या स्पेनमध्ये चित्रपट निर्माता अनिश जोग सोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण अद्याप या दोघांनीही त्यांच्या नात्याला नाव दिलेले नाही. सईने स्पेनमधील शेअर केलेले फोटो पाहून ती एकटी फिरत असल्याचं वाटत होतं, पण तसं नसून तिच्यासोबत निर्माता अनिश जोग देखील असल्याची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

सई आणि अनिश हे दोघेही एकत्र फिरायला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. दोघांनीही एकाच वेळी स्पेनमधील खास फोटो शेअर केले आहेत. जरीही त्यांनी शेअर केलेले फोटो वेगवेगळे असले तरी, त्यांची एक स्टोरी मात्र सारखी होती. त्यानंतर सई आणि अनिश एकत्र स्पेनमध्ये व्हेकेशन एंजॉय करत असल्याचं स्पष्ट झालंय. मध्यंतरी अनेक चाहत्यांना सई ताम्हणकर कोणासोबत फिरतेय असा प्रश्न पडला होता.

अनिश बद्दल सांगायचे तर, तो एक प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माता असून त्याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्याने ‘टाईमप्लीज’, ‘व्हायझेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’ आणि ‘धुरळा’ या सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. (Marathi Film)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT