Priya bapat-Nawazuddin Siddiqui:  Saam tv
मनोरंजन बातम्या

Priya bapat-Nawazuddin Siddiqui: प्रिया बापट नवाझुद्दीन सिद्धिकीसोबत शेअर करणार स्क्रिन, काय आहे सिनेमाची कथा?

Priya bapat-Nawazuddin Siddiqui: दिग्दर्शक सेजल शाह दिग्दर्शित अनटाइटेड थ्रिलर सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Vishal Gangurde

Priya bapat-Nawazuddin Siddiqui:

दिग्दर्शक सेजल शाह दिग्दर्शित अनटाइटेड थ्रिलर सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट लवकरच हिंदी सिनेमात दिसणार आहे. 90 च्या दशकातील मोहक युगात परत घेऊन जाणाऱ्या या मनोरंजक कथेत प्रिया बापट ही नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (Latest Marathi News)

प्रियाने मराठीत 'काकस्पर्श, 'हॅपी जर्नी', 'आम्ही दोघी' आणि 'सिटी ऑफ ड्रीम्स' या सिनेमात तिने अभिनयाची दमदार झलक दाखवली आहे. प्रिया बापटने आतापर्यंत बहुतेक मराठी सिनेमात वास्तववादी पात्रांची भूमिका साकारली आहे. त्यानंतर प्रिया आता अनटाइटेड थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रिया बापट या सिनेमाविषयी म्हणाली की, 'मी ज्या दिवसापासून चित्रपटाची कथा ऐकली. त्या दिवसांपासून या मनोरंजक थ्रिलर सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक होते. त्यात या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. या सिनेमाची स्क्रिप्ट खूप मनोरंजक आहे'.

'नवाझुद्दीनसोबत काम करणे म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकण्यासारखे आहे. आम्ही मनोरंजक कथा रुपेरी पडद्यावर जिवंत करण्यास उत्सुक आहोत, असेही तिने सांगितलं.

दिग्दर्शक सेजल शाह यांनी सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे "प्रिया बापटच्या एन्ट्रीने मला आनंद झाला आहे. प्रिया एक उत्तम अभिनेत्री आहे. नवाज आणि प्रियाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच ताजी आणि हटके आहे, असं सेजल शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या सिनेमाचे चित्रीकरण मुंबईत सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडलिया यांनी लिहिलेली ही स्क्रिप्ट नाटक आणि नॉस्टॅल्जियाचा रोलर-कोस्टर राईड असणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

GK: जगातील असा एक अनोखा देश जिथे एकही डास नाही

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Accident News : लातूरमध्ये कारची दुचाकीला जोरात धडक, ३ तरूणांचा जागीच मृत्यू

Bindusara Dam : बीडकरांची चिंता मिटली; मुसळधार पावसात बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो

SCROLL FOR NEXT