Prajakta Mali Upcoming Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhishi Mitra Mandal: प्राजक्ता माळीने सुरू केले 'भिशी मित्र मंडळ', चित्रपटामध्ये 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री

Prajakta Mali Upcoming Movie: 'भिशी मित्र मंडळ' म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर हा प्राजक्ता माळीचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला पुण्यात सुरूवात झाली.

Priya More

Bhishi Mitra Mandal Film :

मराठमोळी अभिनेत्री, होस्ट आणि बिझनेसवुमन अशा विविध भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता माळीने २०२४ या वर्षामध्ये 'भिशी मित्र मंडळ' (Bhishi Mitra Mandal Movie) सुरू केले आहे. आता 'भिशी मित्र मंडळ' म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर हा प्राजक्ता माळीचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला पुण्यात सुरूवात झाली.

प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो होस्ट करताना दिसत आहे. या कार्यक्रमाबरोबरच ती सध्या काही चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्राजक्ता शेवटची 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटानंतर आता ती 'भिशी मित्र मंडळ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाची घोषणा केली होती.

'भिशी मित्र मंडळ' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली. या चित्रपटामध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. प्राजक्तासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक यांनी केली आहे. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. या चित्रपटातील प्राजक्ता माळी आणि प्रिया बेर्डे या दोन कलाकारांची नावं समोर आली आहेत. आणखी कोण-कोण या चित्रपटामध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटाचे कथानक भिशीबद्दल आहे. भिशी म्हणजे ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांना पैसे वापरायला देतात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून चिठ्ठी काढून ज्याचे नाव येईल त्याला पैसे दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटात प्राजक्ता माळी, प्रिया बेर्डे यांच्यासोबत कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे तरी अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT