Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Net Worth: दागिन्यांचा ब्रँड, आलिशान फार्महाऊस आणि बरंच काही; 'फुलवंती' किती कोटींची मालकीण?

Prajakta Mali Luxury Lifestyle : 'फुलवंती'च्या रूपाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली प्राजक्ता माळी एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. तसेच ती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. प्राजक्ताची एकूण संपत्ती किती जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्राजक्ता माळी एक लोकप्रिय अभिनेत्रीसोबत एक यशस्वी व्यावसायिका देखील आहे. नुकताच प्राजक्ताच्या 'फुलवंती' चित्रपटाने महाराष्ट्रावर जादू केली आहे. 'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट खूप गाजला आहे. या चित्रपटात प्राजक्ताने सुंदर डान्स केला आहे. जो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

प्राजक्ताने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरून सुरू केली होती. तिने मनोरंजन विश्वात आपली स्वतःची खास ओळख तयार केली आहे. तिची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका खूप प्रसिद्ध झाली. यामुळे प्राजक्ताला खूप लोकप्रियता मिळाली. .या मालिकेपासून प्राजक्ताचा यशस्वी करिअरला सुरुवात झाली आणि ती दिवसेंदिवस प्रगती करत गेली. सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचे अँकरिंग करत आहे.

प्राजक्ता माळीचे कर्जतला आलिशान फार्महाऊस आहे. या फार्महाऊसचे नाव 'प्राजक्त कुंज' असे आहे. तिचा हा फार्महाऊस 3 BHK व्हिला आहे. कर्जतमधील गौळवाडी गावात कर्जतचा फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमधून प्राजक्ताची तगडी कमाई होते. या फार्महाऊसचे भाडे मीडिया रिपोर्टनुसार, सुमारे 20-30 हजार रुपये आहे. ती स्वतः कामातून निवांत वेळ काढून फार्महाऊसला फिरायला जाते.

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच एक व्यावसायिका आहे. तिचा 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे. यात तुम्हाला सुरेख दागिने पाहायला मिळतील. मिडिया रिपोर्टनुसार, प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती १६ ते ४० कोटी रुपये आहे. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या लूक आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. प्राजक्ता एक सुंदर कवयित्री देखील आहे. तिला त्यासाठी पुरस्कार देखील मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ice Use For Face: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्याला लावा बर्फ, काचेसारखी चमकेल त्वचा

Maharashtra Live News Update: बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र! शिवसेनेकडून खासदार होणार्‍या ज्योती वाघमारे कोण आहेत?

Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

Nashik : व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही, कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT