Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa Instagram
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Celebrate Gudi Padwa: पूजा सावंतने सिद्धेशसोबत ऑस्ट्रेलियात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, रोमँटिक फोटो केला शेअर

Pooja Sawant And Siddhesh Chavan Photos: सिद्धेश चव्हाण आणि पूजा सावंतने फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजाचा ‘गुढीपाडवा’ हा पहिला सण आहे. नुकतेच अभिनेत्रीने सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले.

Chetan Bodke

Pooja Sawant And Siddhesh Chavan Celebrate Gudi Padwa

गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. त्यातील एक कपल म्हणजे, सिद्धेश चव्हाण आणि पूजा सावंत. या कपलने फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली. यांचा लग्नानंतरचा ‘गुढीपाडवा’ हा पहिलाच सण आहे. लग्नानंतर पूजाने पहिला ‘गुढीपाडवा’ सण साजरा केला आहे. याचे फोटो तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Marathi Actress)

“सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...” असं कॅप्शन देत पूजा सावंतने गुढीपाडव्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गुढीपाडव्यासाठी पुजाने पिवळ्या रंगाची साडी, गळ्यामध्ये मंगळसुत्र, हातात हिरव्या बांगड्या असा लूक तिने केलेला आहे. तर सिद्धेश चव्हाणने पोपटी रंगाचा लखनवी कुर्ता वेअर केलेला आहे. पूजा आणि सिद्धेशने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा भारतात सेलिब्रेट केला नसून तिच्या ऑस्ट्रेलियातील घरी गुढी उभारत लग्नानंतरचा साजरा केला आहे. (Social Media)

गुढीपाडव्यानिमित्त पूजाने खास पुरणपोळी, बटाट्याची भाजी, वरण भात, भजी आणि खीर असा जेवणाचा मेन्यू बनवला होता. हे खास फोटो पूजाने अवघ्या काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेले आहेत. या फोटोमध्ये पुजाच्या ऑस्ट्रेलियातील घराची झलक पाहायला मिळत आहे. २९ हजारांहून अधिक चाहत्यांनी पूजाच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स केले आहेत. अनेक चाहत्यांनी पूजा आणि सिद्धेशला “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...” देत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Marathi News)

२८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने त्याचं नाव सांगत त्याची चाहत्यांसोबत ओळखही करुन दिली. पूजाने प्रेमाची कबुली दिल्यापासून सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव असून तो मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT