Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Video: तू आलास आणि सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली, पूजा सावंतने साखपुड्यात सिद्धेश चव्हाणला लग्नासाठी केला प्रपोज

Pooja Sawant And Siddhesh Chavan Engagement: पूजा सावंतचत्या साखरपुड्याचे क्युट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशामध्ये पूजा सावंतचा साखरपुड्यातील एक खास व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यावेळी तिने सिद्धेश चव्हाणला लग्नासाठी प्रपोज केला आहे.

Priya More

Pooja Sawant And Siddhesh Chavan:

मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) काही दिवसांपूर्वी प्रेमाची कबूली देत आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून पूजा सावंतच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. अशामध्येच तिने १६ फेब्रुवारीला गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. मुंबईमध्ये पूजा सावंतने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत (Siddhesh Chavan) थाटामाटात साखरपुडा केला. तिच्या साखरपुड्याला मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, तिच्या जवळचा मित्र परिवार आणि नातेवाईकांनी हजेरी लावली.

पूजा सावंतचत्या साखरपुड्याचे क्युट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशामध्ये पूजा सावंतचा साखरपुड्यातील एक खास व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यावेळी तिने सिद्धेश चव्हाणला लग्नासाठी प्रपोज केला आहे. पूजा सावंतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या साखरपुड्यातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

साखरपुड्यातील खास व्हिडीओमध्ये पूजा सावंत म्हणताना दिसतेय की, 'मिस्टर सिद्धेश चव्हाण, जेव्हा कुठे तरी प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता. मला कधीच वाटलं नव्हतं की मी प्रेम करू शकते कुणावर इतकं. आणि तू आलास आणि माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू मला विचारले नसते तर कदाचित मीच तुला विचारले असते. पण आज सर्व देवांसमोर आणि आपल्या कुटुंबीयांसमक्ष मी तुला विचारते माझ्याशी लग्न करशील?' अशा पद्धतीने पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणला लग्नासाठी प्रपोज केला.

या दोघांचा साखरपुडा होतानाचे खास क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर सिद्धेश गुडघ्यावर बसून पूजाला अंगठी घालतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. पूजा जेव्हा सिद्धेशला लग्नासाठी प्रपोज करते तेव्हा तिचे सेलिब्रिटी फ्रेंड जोरजोरात ओरडतात. या व्हिडीओमध्ये पूजा सावंत सिद्धेश चव्हाणची काळजी घेताना दिसत आहे. दोघांचेही रोमँटिक क्षण या व्हिडीओमध्ये टिपण्यात आले आहे. साखरपुड्यावेळी पूजाच्या मित्रांनी डान्स परफॉर्मन्स देखील केला.

पूजा-सिद्धेशच्या साखरपुड्याला वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे आणि तिचा नवरा अभिषेक जावकर, फुलवा खामकर, गश्मीर महाजनी यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पूजा आणि सिद्धेश दोघांनीही साखरपुड्यासाठी खास मराठमोळा लूक केला होता. पूजाने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाची पैठणी साडी, नाकात नथ, गळ्यात सोन्याचा हार असा मराठमोळा साज केला होता. तर, पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याने अर्थात सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता.

साखरपुड्यानंतर या दोघांनी देखील क्युट ड्रेसिंग केली होती. पूजाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाचा शेरवानी सूट परिधान केला होता. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा मुळचा मुंबईकर आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये असतो. तो ऑस्ट्रेलियात फायनन्ससंबंधित काम करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT