Pooja Sawant Romantic Dance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pooja Sawant Romantic Dance: पूजा सावंतने परदेशात पतीसोबत केला रोमँटिक डान्स; भूषण प्रधानला दिल्या खास शुभेच्छा, म्हणाली...

Pooja Sawant Romantic Dance With Husband: मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पूजाने नुकताच पती सिद्धेशसोबत रोमँटिक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चर्चेत असते. पूजा सावंत अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पूजा सावंतने नुकचाच नवऱ्यासोबतचा एका रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त परदेशात असतो. पूजाने परदेशात जाऊन नवऱ्यासोबत रोमँटिक डान्स केला आहे. तिच्या या डान्सचे आणि मित्र भूषण प्रधानचे एक खास कनेक्शनदेखील आहे.

पूजाने 'घरत गणपती' या चित्रपटातील गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. नवऱ्यासोबत रोमँटिक स्टेप्स करत चाहत्यांची मने जिंकली आहे. घरत गणपती या चित्रपटात भूषण प्रधान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे पूजाने मित्राला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. पूजा आणि सिद्धेशचा हा रोमँटिक डान्स चाहत्यांना खूपच आवडला आहे.

पूजाने हा व्हिडिओ शेअर करत मित्र भूषणसाठी खास पोस्ट केली आहे. या गाण्यावर मी माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत डान्स करण्यासाठी वाट पाहिली. सिद्धेश आणि माझ्याकडून घरत गणपतीच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. भूषण तुला चित्रपटासाठी खास शुभेच्छा. मला माहितीये तू नेहमी सगळंत बेस्ट करतो. २६ जुलैला घरत गणपती चित्रपट प्रदर्शित होतोय. असं कॅप्शन तिने दिले आहे.

'घरत गणपती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात भूषण प्रधान, शुभांगी गोखले, निकिता, अश्विनी भावे महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कोकणातील गणेशोत्सवार आधारित आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रेक्षक विशेष वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT