Ashok Mama Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Mama: अशोक मामांच्या मालिकेत निवेदिता सराफांची एन्ट्री; २० वर्षांनंतर करणार एकत्र काम, पाहा पहिला प्रोमो…

Ashok Mama Serial: दशकांपासून प्रेक्षकांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं जादूई नातं मोठ्या पडद्यावर अनुभवले आहे. आता ही आवडती जोडी लवकरच पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र येत आहे.

Shruti Vilas Kadam

Ashok Mama Serial: दशकांपासून प्रेक्षकांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं जादूई नातं मोठ्या पडद्यावर अनुभवले आहे. पडद्यावरील अप्रतिम टायमिंग, गोड केमिस्ट्री आणि भावनिक सादरीकरण हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी नेहमीच खास ठरले आहे. आता ही आवडती जोडी लवकरच पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र येत आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे कारण पुन्हाएकदा त्यांच्या साजेश्या गोड आणि हृदयस्पर्शी नात्याची जादू रूपेरी पडद्यावरून थेट घराघरांत पोहोचणार आहे.

त्यांच्या हसऱ्या केमिस्ट्रीपासून ते भावनिक प्रसंगांपर्यंत, या जोडीनं प्रत्येक वेळेस हृदयाला भिडणारे क्षण दिले आहेत. आता त्यांचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा ‘अशोक मा.मा.’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर खुलणार आहे. नक्की काय घडणार मालिकेत ? अशोक मा.मा. आणि निवेदिता यांच्यामधील नातं कसं खुलणार? अशोक मा.मा. मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येणार आहेत. तेव्हा नक्की बघा अशोक मा.मा. या मालिकेत सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

या मालिकेत निवेदिता ताई ही भूमिका साकारणार आहेत. त्या उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहेत. त्या स्वतःचा ‘संस्कार वर्ग’ चालवतात. पण त्यांचा संस्कार वर्ग हा पारंपरिक चौकटीत बसलेला नाही; तो आहे दया,आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेने भरलेला. त्या मुलांना कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून जीवनमूल्यं शिकवतात. जेव्हा अशोक मा.मा. आपल्या नातवंडांना इरा आणि इशानला या वर्गात आणतात, तेव्हा त्यांना अपेक्षा असते एका शिस्तप्रिय, पारंपरिक शिक्षिकेची. पण समोर येते एक वेगळीच स्त्री आधुनिक विचारांची, पण मुळाशी असलेली. तिची मोकळी, हटके शिकवण्याची पद्धत मामांचे ठाम विचार हादरवून टाकते. आता हळूहळू दोघांमधील चकमकीतून यांचं नातं कोणतं वळण घेणार ? मालिकेत कळेलच.

निवेदिता सराफ याबद्दल म्हणाल्या, "मला खूप दिवसांपासून प्रेक्षक विचारात होते तुम्ही आणि अशोक सराफ एकत्र कधी काम करणार आहात. तर बऱ्याच दिवसांपासून माझी देखील इच्छा होती त्यांच्यासोबत काम करायची. मला खरंच खूप आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला, माझे सर्वात आनंदाचे दिवस असतात जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करते. खूपकाही शिकायला मिळतं. बऱ्याच वर्षांनी संधी मिळाली आहे मला हि, आता लवकरच अशोक मा.मा. या मालिकेत माझी एंट्री होणार आहे. यामधील खास गोष्ट म्हणजे छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. मी खूप उत्सुक आहे, खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT