Manasi Naik  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mansi Naik Divorce: मानसी नवऱ्यापासून विभक्त होणार, 'हो मी घटस्फोट घेतेय' म्हणत केले महत्वाचे खुलासे

मानसीने २०२१ मध्ये प्रदिप खरेरा सोबत लग्नगाठ बांधली होती. त्या दोघांच्याही नात्यात सध्या आलबेल नसल्याचे कळून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mansi Naik: अभिनेत्री मानसी नाईक मराठी प्रेक्षकांसमोर 'बाई वाड्यावर या' आणि 'वाट बघतोय रिक्षावाला' या गाण्यातून समोर आली होती. सोबतच मानसी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मानसीने २०२१ मध्ये प्रदिप खरेरा सोबत लग्नगाठ बांधली होती. त्या दोघांच्याही नात्यात सध्या आलबेल नसल्याचे दिसत आहे. यावर मानसीने आधी घटस्फोटासंबंधित स्पष्ट सांगितले नव्हते. पण आता मानसीने तिच्या घटस्फोटावर आपले मौन सोडले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना मानसी म्हणते, 'हो मी घटस्फोट घेतेय. त्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे' असं मानसीने स्पष्ट सांगितले. मानसी नाईकच्या या धक्कादायक खुलास्यानंतर तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या लग्नाच्या दिड वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांना सोशल मीडियावर त्यांचे चाहते चांगली पसंती दर्शवत होते. दोघांचे रील्स व्हिडिओ आणि फोटो सातत्याने व्हायरल होत असतात.

मानसी नाईकने घटस्फोटाच्या निर्णयावर आपले परखड मत व्यक्त करत म्हटली, "हो आमच्या घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोट बोलणार नाही. मी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दिला आहे. या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. मी सध्या खूपच दु:खी आहे. सर्व गोष्टींमध्ये नेमकं काय चुकलंय हे सांगणे आता माझ्यासाठी खूप कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठिक होऊ शकल्या नव्हत्या. या सर्व प्रक्रिया खूपच वेगात घडल्या. पण मला माझ्या प्रेमावर आजही विश्वास कायम आहे."

पुढे मानसी म्हणते, "मला पुन्हा प्रेम करायचं आहे. एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि मी तेव्हा लग्न केलं. मला वाटतं तिथेच काहीतर चुकलं. पण आता या लग्नाच्या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आली आहे. पण मला त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाबद्दल नेहमीच आदर आहे. परंतू एक स्त्री म्हणून मला माझा स्वाभिमान आहे. स्वत:ची काही मतं आहेत आणि ती महत्त्वाची आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण सोडून देऊया इतक्या खालच्या थराला ती व्यक्ती जाऊ शकते हे कळणं माझ्यासाठी गरजेचं होतं."

सोबतच मानसी पुढे म्हणाली, "आजकाल लोकं नात्यातील मानसिक आरोग्याबद्दल बोलतात. त्यामध्ये आपल्या जोडीदाराला कसे समजुन घ्यावे, एकमेकांसोबत कसे बोलावे इथपर्यंत आपल्याला माहिती मिळत असते.

जर जोडीदारात आणि तुमच्यात समंजसपणा नसल्यास तुमच्या नात्यात दुरावा जाणवतो. अशा नात्यातून तात्काळ बाहेर पडा आणि पुढे जा, असा सल्लाच तिने यावेळी दिला आहे. माझे बालपण पु्ण्यात गेले.

ज्या व्यक्तीवर तु्म्ही प्रेम करताय त्याला पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. यामध्ये एकाला समर्थन मिळत आहे तर एकाला समर्थन मिळत नाही, अशा नात्यातून लगेचच बाहेर पडलेले कधीही उत्तम."

मानसीचा 'एकदम कडक' मराठी चित्रपट प्रदर्शित येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT