Hruta Durgule Commander Karan Saxena Series BTS Video Instagram
मनोरंजन बातम्या

Hruta Durgule BTS Video : 'महाराष्ट्राच्या क्रश'चा ॲक्शनबाज लूक पाहिलात का ? 'कमांडर करण सक्सेना' सीरीजमध्ये करते गुंडांशी दोन हात

Commander Karan Saxena Series : मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतर आता बॉलिवूडमधून ओटीटी क्षेत्रातही डेब्यू केले आहे. 'कमांडर करण सक्सेना' या सीरीजच्या माध्यमातून अभिनेत्रीने ओटीटी क्षेत्रात डेब्यू केले आहे.

Chetan Bodke

'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू' मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला विशेष प्रसिद्धी मिळाली. 'फुलपाखरू' मालिकेच्या माध्यमातून हृताने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण केले. तिने मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतर आता बॉलिवूडमधून ओटीटी क्षेत्रातही डेब्यू केले आहे. 'कमांडर करण सक्सेना' या सीरीजच्या माध्यमातून अभिनेत्रीने ओटीटी क्षेत्रात डेब्यू केले आहे. या सीरीजमध्ये हृता एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या काही ॲक्शन सीन्सची जोरदार चर्चा सुरू आहे.

कायमच वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या हृताने 'कमांडर करण सक्सेना' या सीरीजमध्ये एक वेगळीच भूमिका साकारली आहे. एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये हृता दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर हृताने सीरीजच्या शुटिंग दरम्यानचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती स्टंट आणि धडाकेबाज ॲक्शन सीन्स करताना दिसत आहे. यामध्ये ती एका गुंडाचा पाठलाग करत त्याला मारताना दिसत आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्रीने विशेष मेहनत घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कायमच रोमँटिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ऋताच्या या धडाकेबाज अंदाजाने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे.

पाकिस्तानचा कट उधळवून टाकण्याच्या तयारीत असलेल्या 'कमांडर करण सक्सेना' यांची गोष्ट या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. 'महाराष्ट्राची क्रश' हृता दुर्गुळेसोबत या सीरिजमध्ये अभिनेता गुरमीत चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हृता या वेबसीरीजमध्ये एसीपी रचना म्हात्रे या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय. ८ जुलैला ही वेब सीरिज Disney + Hotstar वर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.

या सीरीजच्या माध्यमातून हृताने बॉलिवूड डेब्यू केले आहे. तर, 'अनन्या' चित्रपटातून हृताने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, रुपेरी पडद्यावर डेब्यू केले होते. हृता दुर्गुळेच्या कामाबद्दल बोलायचे तर, हृता शेवटची 'कन्नी' चित्रपटामध्ये दिसली होती. त्यानंतर ती थेट 'कमांडर करण सक्सेना' या सीरीजमध्येच दिसली. तिच्या आगामी प्रोजेक्टच्या सध्या चाहते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर कारने घेतला अचानक पेट

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT