Hemal Ingle  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Hemal Ingle : गुडन्यूज! मराठमोळ्या अभिनेत्रीनं VIDEO शेअर करत चाहत्यांना दिलं सरप्राइज

Hemal Ingle Buy New Car : मराठमोळी अभिनेत्री हेमल इंगळेने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. नुकतीच तिने लग्जरी कार खरेदी केली आहे. ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shreya Maskar

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कलाकारमंडळी चाहत्यांना गुडन्यूज देत आहेत. या वर्षात कोणी नवीन घर घेतले तर कोणी आपल्या नात्याचा खुलासा केला. काहींनी तर लग्नगाठ देखील बांधली आहे. तर काही कलाकारांनी लग्जरी गाड्या खरेदी केल्या आहेत. अशीच एक आनंदाची बातमी मराठमोळ्या अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारी अभिनेत्री हेमल इंगळेच्या (Hemal Ingle) घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे.

अभिनेत्री हेमल इंगळेने सोशल मीडियावर पोस्ट करून ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. हेमल इंगळेच्या नव्याकोऱ्या लग्जरी कारचे नाव 'फोक्सवॅगन पोलो जीटीआय' ( Volkswagen Polo GTI) असे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या आलिशान कारची किंमत 25 लाखांच्यावर आहे. तिने लाल रंगाची सुंदर कार खरेदी केली आहे. कार खरेदी करण्यासाठी हेमल इंगळे तिच्या कुटुंबासोबत गेली होती. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हेमल इंगळे वर्कफ्रंट

'अशी ही आशिकी'मुळे अभिनेत्री हेमल इंगळेला खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने सुपरस्टार सचिन पिळगांवकर यांच्यासोबत देखील काम केले आहे. ती 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये झळकली. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले आहेत. यात 'किर्रर्र काटा किर्रर्र' आणि 'हार्दिक शुभेच्छा'चित्रपटात झळकली. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेमल इंगळे लग्नगाठ

अभिनेत्री हेमल इंगळेने या वर्षी जानेवारी 2025मध्ये लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिने तिचा बॉयफ्रेंड रौनक चोरडियासोबत विवाह केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT