Girija Oak New Drama Saam Tv
मनोरंजन बातम्या

Girija Oak: गिरिजा ओकने केली 'ठकीशी संवाद' नाटकाची घोषणा, सुव्रत जोशीसोबत साकारणार मुख्य भूमिका

Girija Oak New Drama: 'ठकीशी संवाद' (Thakishi Samvad)हे नाटक घेऊन गिरिजा ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकामध्ये गिरीजा ओकसोबत अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Priya More

Thakishi Samvad Natak:

मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोठी अभिनेत्री गिरीजा ओक लवकरच एक नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. नुकताच गिरीजा ओकने (Girija Oak) जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून नव्या नाटकाची घोषणा केली. 'ठकीशी संवाद' (Thakishi Samvad)हे नाटक घेऊन गिरिजा ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकामध्ये गिरीजा ओकसोबत अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे.

गिरिजाने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. रंगभूमीपासून तिने मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. नाटक, मालिका आणि चित्रपट हे तिन्ही माध्यमं ती गाजवत आहे. गिरिजा ही कायम तिच्या अनोख्या भूमिकासाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

गिरीजा ओकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नाटकासंदर्भा पोस्ट केली आहे. तिने या नाटकाचे पोस्टर शेअर करत ही गुड न्यूज शेअर केली आहे. 'ठकीशी संवाद' या नाटकाचा 10 मे 2024 रोजी शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित 'ठकीशी संवाद' हे नाटक नेमकं काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

गिरीजा ओकने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'जवान' चित्रपटांमध्ये गिरीजाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'जवान'चित्रपटानंतर गिरिजा रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. गिरीजा ओक या नाटकात काय भूमिका साकारणार हे बघणं उत्सुकतेच असणार आहे. आजवर गिरिजाने रंगभूमीवर अनेक नाटकात काम केली आणि आजच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने तिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT