Gayatri Datar Wedding Saam tv
मनोरंजन बातम्या

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, VIDEO व्हायरल

Gayatri Datar Wedding: अभिनेत्री गायत्री दातारने श्रीकांत चौरेसोबत लग्न केलं. पारंपरिक पद्धतीत झालेल्या या ग्रँड व्हेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Shruti Vilas Kadam

Gayatri Datar Wedding: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार सध्या तिच्या आयुष्यातील खास क्षणामुळे चर्चेत आहेत. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्रीने तिचा बॉयफ्रेंड श्रीकांत चौरे याच्यासोबत विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

हा विवाहसोहळा २६ एप्रिल २०२६ रोजी अतिशय खास आणि थाटामाटात पार पडला. या समारंभात जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि काही खास सेलिब्रिटी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने झालेल्या या लग्नात गायत्रीने लाल रंगाची नऊवारी साडीमध्ये अत्यंत सुंदर लूक साकारला होता, तर श्रीकांतने शेरवानी परिधान करत नवऱ्याचा देखणा अंदाज दाखवला. हा व्हिडिओ राजश्री मराठीने पोस्ट केला आहे.

लग्नापूर्वीचे सर्व विधी देखील मोठ्या उत्साहात पार पडले होते. मेहेंदी, ग्रहमुख यांसारख्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांची हळद आणि लग्नविवाह खासगी पद्धतीने पण मोठ्या थाटामाटात पार पडलं.

गायत्री आणि श्रीकांत यांची लव्हस्टोरीही तितकीच खास आहे. दोघांची भेट एका डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. सुरुवातीला साध्या ओळखीपासून सुरू झालेलं हे नातं हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदललं. जवळपास दीड वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

गायत्री दातारने ‘तुला पाहते रे’ या मालिकेत ‘ईशा’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली. आता तिच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT