Bhagyashree Mote Divorce Instagram
मनोरंजन बातम्या

Bhagyashree Mote Divorce: अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट करत दिली माहिती

Bhagyashree Mote And Vijay Palande Divorce: मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने सोशल मीडियावर पोस्ट करत पती विजय पालांडेने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

Chetan Bodke

Bhagyashree Mote And Vijay Palande Divorce

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर पोस्ट पती विजय पालांडे यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. भाग्यश्री आणि विजयचा १० ऑक्टोबर २०२२ रोजी साखरपुडा झाला होता. पण या कपलने लग्नाआधीच जवळपास दीड वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. (Marathi Actress)

भाग्यश्री मोटे कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फॅशनेबल फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचा हा विभक्त होण्याचा निर्णय पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. भाग्यश्री मोटेने पोस्टमध्ये लिहिलं की, “नमस्कार मित्रांनो, ही पोस्ट केवळ माहिती देण्यासाठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही एकमेकांसोबत एकत्र राहत होतो. मी आणि विजय काही चांगल्या कारणांमुळे पार्टनर म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आम्ही दोघेही एक चांगले मित्र म्हणून कायम राहू! कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा! धन्यवाद!” अशी पोस्ट भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने विजयलाही टॅग केलं आहे. भाग्यश्रीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (Social Media)

विजय पालांडे हा लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. त्याने आजवर अनेक सेलिब्रिटींबरोबर काम केलं आहे. विजय आणि भाग्यश्रीच्या साखरपुड्याला हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी देखील हजेरी लावली होती. भाग्यश्री मोटेनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

SCROLL FOR NEXT