Archana Mahadev Saam Tv
मनोरंजन बातम्या

Archana Mahadev: दुष्काळग्रस्त भागातून आलेली अर्चना रुपेरी पडद्यावर झळकणार, सोशल मीडियावर होतेय या नव्या अभिनेत्रीची चर्चा...

एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी तो क्षण येतो.

Chetan Bodke

Archana Mahadev: एकांकिका, नाटक, लघुपट अशा प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं अनेकांच स्वप्न असतं. पण खूप कमी कलाकारांच्या नशिबी तो क्षण येतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या अर्चना महादेव या हरहुन्नरी अभिनेत्रीच्या वाट्याला मात्र हे भाग्य आले आहे. खडतर परिस्थितीवर मात करत तिने जिद्दीने हे यश मिळाले आहे. मुख्य भूमिका असलेले आणि अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेले 'घोडा' आणि 'मसुटा' हे दोन चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागात असलेल्या जामगाव या खेड्याची ओळख महादाजी शिंदे यांच्या वाड्यामुळे आहे. या ऐतिहासिक ओळखी बरोबरच आता हे गाव रुपेरी जगतात देखील अर्चना महादेवच्या नावाने ओळखले जाणार यात शंका नाही.

बालपणीच पितृछत्र हरवलेल्या अर्चनाचा सांभाळ आईने शिवणकाम करत केले. आईच्या कष्टाचे चीज करणाऱ्या अर्चनाने आजवर अनेक एकांकिका, नाटके आणि लघुपटातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. तसेच तिने पडद्यामागे लेखन, संकलन आणि दिग्दर्शन विभागातही आपल्या कामाचा ठसा उमटवला.

आजवरचा संघर्षमय प्रवास आणि आगामी दोन चित्रपटातील मुख्य भूमिकेत झळकण्याबद्दल बोलताना अर्चना महादेव म्हणते, "आपल्याला एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण एखादी भूमिका करायची असेल तर अभिनय करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या लोकांचा अभ्यास हा त्यांच्यासोबतच राहून करावा लागतो. साहजिकच त्यासाठी निरीक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे. दोन्ही चित्रपटातील माझ्या भूमिका या फार वेगळ्या आहेत. मात्र, जन्म गावचा असल्याने खऱ्या जीवनात वाट्याला आलेला संघर्षाचा खूप महत्वाचा वाटा होता."

अर्चना महादेवची मुख्य भूमिका असलेल्या 'घोडा' या चित्रपटाला दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात 'बेस्ट ज्यूरी अवॉर्ड' तर 'मसुटा' चित्रपटाला विविध महोत्सव, पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

SCROLL FOR NEXT