Prajakta Mali Launch New Jewellery Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं ऑस्ट्रेलियातून चाहत्यांना दिलं सरप्राइज, 'म्हाळसा'चं न्यू कलेक्शन लाँच

Prajakta Mali Launch New Jewellery Collection: प्राजक्ताने ऑस्ट्रेलियातून आपल्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज दिले आहे. प्राजक्ताने ऑस्ट्रेलियातून लाइव्ह करत 'प्राजक्तराज साज' या मराठमोळ्या दागिन्यांच्या ब्रँडसाठी दोन नवीन दागिने लाँच केले आहेत.

Priya More

Prajaktaraj Saaj Brand:

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आली आहे. प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या (maharashtrachi hasya jatra) टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम याठिकाणावरून व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहे. प्राजक्ता माळीने देखील ऑस्ट्रेलियातून धम्माल करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. प्राजक्ताने ऑस्ट्रेलियातून आपल्या चाहत्यांसाठी खास सरप्राइज दिले आहे. प्राजक्ताने ऑस्ट्रेलियातून लाइव्ह करत 'प्राजक्तराज साज' या मराठमोळ्या दागिन्यांच्या ब्रँडसाठी दोन नवीन दागिने लाँच केले आहेत.

ऑस्ट्रेलियात असताना देखील प्राजक्ता माळी आपला बिझनेस संभाळत आहे. प्राजक्ताने ऑस्ट्रेलियातून इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. तिने आपल्या 'प्राजक्तराज साज' या ब्रँडसाठी चांदीचे दोन नवीन दागिने लाँच केले. प्राजक्ताने यावेळी म्हाळसा कलेक्शनमध्ये म्हणजेच तिच्या चांदिच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये 'तन्मणी' हा नवा दागिना लाँच केला. तन्मणी सेटचे दोन प्रकार प्राजक्ताने यावेळी लाँच केले.

लाईव्हद्वारे प्राजक्ताने तन्मणी दागिन्याचे नवीन दोन प्रकाराचे डिझाइन देखील दाखवले. 'माणिकरत्न तन्मणी' आणि 'श्वेतरत्न तन्मणी' असे या दोन्ही दागिन्यांची नावं आहेत. हे दोन्ही दागिने लाँच करत तिने या दागिन्यांचे महत्व सांगितले आहे. तसंच हा दागिना आतापर्यंत चांदीमध्ये नव्हता. म्हाळसा कलेक्शनद्वारे हा दागिना चांदीमध्ये तयार करण्यात आला आहे. प्राजक्ताने माणिकरत्न तन्मणी हा दागिना घातला होता. तर वनिता खरातने श्वेतरत्न तन्मणी हा दागिना घातला होता.

प्राजक्ता माळी सध्या परदेशातूनच नवनवीन दागिने लाँच करताना दिसत आहे. शेवटचा दागिना सिंगापूरमध्ये लाँच करण्यात आला होता. तर हा नवा दागिना ऑस्ट्रेलियामधून लाँच करण्यात आला आहे. दरम्यान, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून ते ठिकठिकाणी लाइव्ह कार्यक्रम करत आहेत. या दौऱ्यादरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला भेट दिली होती. त्याचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

When to do heart checkup: भारतातील 30% मृत्यू हार्ट अटॅकमुळेच! धोका टाळण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आणि कधी?

Vice President Election : उपराष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? नेमकी प्रक्रिया काय असते? जाणून घ्या सविस्तर

UPI Payment: आता पिनशिवाय होणार UPI पेमेंट, फक्त तुमच्या फेस लॉकने

SCROLL FOR NEXT