Amruta Khanvilkar New Business  Instagram/ @amrutakhanvilkar
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: अमृताचा अभिनयासोबतच सुरू आहे ‘हा’ उद्योग, नवा व्यवसायपाहून तु्म्हीही लोटपोट व्हाल

अमृताने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर उपस्थिती लावली होती. त्या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Amruta Khanvilkar: अवघ्या महाराष्ट्राला चंद्राच्या तालावर नाचवणाऱ्या अमृता खानविलकरची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अमृताला नुकताच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ने गौरविण्यात आले. त्यामुळे अमृताने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर उपस्थिती लावली होती. त्या दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात तिच्या फिटनेसवरून तिला टोमणे मारण्यात आले.

अमृता नेहमीच आपल्या फिटनेसकडे फार लक्ष देते. सोबतच ती आपल्या अभिनयामुळे ही चर्चेत असते. अमृताने बॉलिवूडमध्येही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमृता सोमवारी ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ निमित्त ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर आली होती. त्या वेळी श्रेया बुगडेने एका महिला पत्रकाराचं पात्र साकारत अमृताशी संवाद साधला. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

श्रेया अमृताला म्हणते, “गेले कित्येक वर्ष अमृता चाहत्यांची दिशाभूल करत आहे. अभिनय हे तिचं करिअर नाही. माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे.” श्रेयाचं हे म्हणणं ऐकून सुरुवातीला अमृताही थक्क होते. पण नंतर तिचे हे वाक्य ऐकून तिला ही हसू आवरता येत नाही.

श्रेया पुरावा म्हणून एक व्हिडीओ दाखवायला सांगते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अमृतासह सगळ्यांनाच हसू अनावर होतं. यावेळी श्रेया अमृताला टोमणा मारत म्हणते, “अमृताचं पंक्चर काढण्याचं दुकान आहे.”

दरम्यान त्या व्हिडीओत अमृता व्यायामाचा एक प्रकार म्हणून टायर उचलताना दिसत आहे. सोबतच काही व्यायामाचे ही प्रकार करताना ती दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच सेलिब्रिटी पोट धरुन हसू लागतात. तर अमृताही अगदी पोट धरुन हसू लागते. तर या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT