Sagar Karande Photos  Instagram/ @saagarkarande
मनोरंजन बातम्या

Sagar Karande: सागर कारंडेचा नाटकानिमित्त 'ट्रॅक्टर ऑन ट्रॅक'

सागर एका नाटकाच्या दौऱ्या निमित्ताने कऱ्हाडला गेला असून तेथील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'झी मराठी' ने आपल्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी २०१४ पासून 'चला हवा येऊ द्या ' या कार्यक्रमाची सुरूवात केली. प्रेक्षक कार्यक्रमासोबत त्यातील कलाकारांनाही आपल्या प्रेमातून उत्तम कार्याची पोचपावती देत आहेत. या कार्यक्रमाने कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, सागर कारंडे आणि डॉ निलेश साबळे या कलाकारांना खूपच लोकप्रियता मिळाली आहे. (Marathi Actress)

देश-परदेशात त्यांचे चाहतेही त्यांच्या कलाकृतीला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. आपल्या अभिनयातून चाहत्यांचा मनावर छाप पाडणारा सागर कारंडे (Sagar Karande) नेहमीच उत्तमोत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करतो. (Marathi Actors)

नुकताच सागर 'हिच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने कऱ्हाडला गेला आहे. त्यावेळचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. (Viral Video)

नाटकाच्या प्रयोगानंतर सागर नाटकातील सहकलाकारांबरोबर मौजमजा करताना दिसत आहे. नाटकाच्या टीमबरोबर सागर कऱ्हाडपासून जवळ असलेल्या त्याच्या गावी गेला. तिथेही या सगळ्यांनी खूप धम्माल केली. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर त्याने शेअर केले. त्यातील एका व्हिडिओमध्ये सागर शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. सागरनं व्हिडिओ शेअर करताना 'ट्रॅक्टर ऑन ट्रॅक' असं म्हटले आहे.गावकडे मौजमजा करताना आणखी एका व्हिडिओमध्ये सागर आणि त्याचे मित्र मंडळी एका नदीजवळ बसलेली दिसत आहे. तिथं बसून हे सर्वजण सुखाचे चार क्षण आनंदात घालवताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT