Jai Jai Maharashtra Majha Sonf Saam TV
मनोरंजन बातम्या

Jai Jai Maharashtra Majha New Song: केदार शिंदेंनी घातला घाट; महाराष्ट्र गीतातून कलाकारांना एकत्र आणत शाहीर साबळेंना वाहिली आदरांजली

New Song From Maharashtra Shaheer: शाहीरांनी गायलेले 'महाराष्ट्र गीत' नव्या रूपात प्रदर्शित करण्यात आले आहे.

Pooja Dange

Marathi Actors Pays Tribute To Shaheer Sabale: केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'महाराष्ट्र शाहीर' महाराष्ट्राला कळावेत यासाठी केदार शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतचं शाहीरांनी गायलेले 'महाराष्ट्र गीत' नव्या रूपात प्रदर्शित करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताचे लोकार्पण झाले आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा' या नवीन गीतात अनेक कलाकारांचा समावेश आहे. तर अजय गोगावलेने हे गाणे गायले आहे. हे गीत ४ मिनिटे १३ सेकंदाचे आहे.

महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणे शाहीर साबळे यांचे मूळ गाणे आहे. आता हे नव्या रूपात प्रदर्शित झाले आहे. जय जय महाराष्ट्र माझा या नवीन गाण्यात अनेक मराठी कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या गाण्यात शिव ठाकरे, आकाश ठोसर, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव, गश्मिर महाजनी, भारत जाधव, आदेश बांदेकर, उमेश कामात, प्रसाद ओक, सचिन खेडेकर, स्वप्निल जोशी, नागराज मंजुळे. पुष्कर जोग, अभिजीत खांडकेकर, आदिनाथ कोठारे, प्रथमेश परब आणि ललित प्रभाकर हे १८ कलाकार आहेत.

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटही या गाण्यातून शाहीर साबळे यांना एक वेगळे आदरांजली वाहण्यात आली आहे. राज्य सरकारने 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक सरकारी आणि सामाजिक कार्यक्रमात राष्ट्रगीताप्रमाणे आपल्याला हे राज्यगीत देखील ऐकायला मिळणार आहे.'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारले होते.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानिमित्त अनेक नवनवीन उपक्रम आणि प्रयोग करण्यात येत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे या चित्रपसाठी खूप मेहनत करत आहेत. गेली चार वर्ष ते या चित्रपटावर काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माजी उपराष्ट्रपतींना नजर कैदेत ठेवलंय, ते सुरक्षित नाहीत'; बड्या खासदाराचं अमित शहांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: महादेवी हत्तीणी प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार

Today Gold Rate: रक्षाबंधनानंतर सोन्याचे दर ७६०० रुपयांनी घसरले; १० तोळ्याचा आजचा भाव किती?

Chhatrapati Shivaji Terminus: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आधीचे नाव काय होते? वाचा इतिहास

Radha Ashtami 2025 : राधा अष्टमी २०२५ कधी आहे? जाणून घ्या पूजा, मुहूर्त व महत्त्व

SCROLL FOR NEXT