Chinmay Mandlekar Sunny Movie Poster Instagram/ @chinmay_d_mandlekar
मनोरंजन बातम्या

Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकर ‘सनी’मध्ये झळकणार, राजकारण्याच्या भूमिकेने लक्ष वेधले...

चित्रपटातील नुकतेच एक पात्र प्रेक्षकांच्यासमोर आले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत क्षिती जोग, ललित प्रभाकर सोबतच चिन्मय मांडलेकरही दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chinmay Mandlekar: येत्या १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येत आहेत. काही दिवसांपुर्वी चित्रपटातील काही गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले होते, त्या गाण्यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटातील नुकतेच एक पात्र प्रेक्षकांच्यासमोर आले आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत क्षिती जोग, ललित प्रभाकर सोबतच चिन्मय मांडलेकरही दिसणार आहे. चित्रपटात चिन्मय विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदारांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय शैलीत दिसून येत आहे. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासत आहे. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच स्पष्ट होईल. चिन्मयचा फ्रेश आणि वेगळा लुक सोशल मीडियावर सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेत आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजुनच वाढली आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. मराठी प्रेक्षकांना सुपरहिट आणि उत्तम आशय असलेला 'झिम्मा' दिल्यानंतर आता ही टीम प्रेक्षकांना 'सनी' हा चित्रपट देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT