Swapnil Joshi On Ashok Saraf Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…, स्वप्निल जोशीची अशोक सराफांसाठी खास पोस्ट

Swapnil Joshi On Ashok Saraf: मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशीने (Swapnil Joshi) अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत त्याने असोक सराफ यांचे कौतुक देखील केले आहे.

Priya More

Maharashtra Bhushan Award:

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर होताच सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत अशोक सराफ यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. अशातच आता मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशीने (Swapnil Joshi) अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत त्याने असोक सराफ यांचे कौतुक देखील केले आहे.

अभिनेता स्वप्निल जोशीने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अशोक सराफ यांच्यासोबतचा एक क्युट सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वप्निलने अशोक सराफ यांना मिठी मारल्याचे दिसत आहे. या माध्यमातून स्वप्निल जोशीने अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल अभिनंदन केले. स्वप्निल जोशीने या फोटोला सुंदर कॅप्शन दिले आहे. त्याने असे लिहिले की, 'सिने जगत ज्या माणसाशिवाय अपूर्ण आहे! 'सुपरस्टार' ही उपमा ज्यांना खऱ्या अर्थाने लागू होते ! जितका मोठा नट, तितकाच साधा माणूस…हो, अजूनही! त्यांना पुरस्कार जाहीर झाला आणि प्रत्येक मराठी माणसाला आपला वैयक्तिक गौरव झाल्यासारखं वाटलं! 'महाराष्ट्र भूषण' श्री. अशोक सराफ!!!! आपल्या सगळ्यांचे लाडके 'अशोकमामा'!!!'

स्वप्निल जोशीने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, 'तुमच्या आपुलकी आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. अनेक दशकांपासून तुम्ही आमच्या चेहऱ्यावर जे हसू आणले आहे त्याबद्दल धन्यवाद. लव्ह यू.' स्वप्निल जोशीच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहेत. स्वप्निलचे चाहते या पोस्टवर कमेंट्स करत अशोक सराफ यांचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आनंद व्यक्त केला होता. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी सांगितले होते की, 'मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. मला माझं काम तेवढंही वाटत नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण दिग्गजांच्या पंक्तीला नेऊन बसवलंय त्यामुळे मी नि:शब्द झालो आहे. ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे ते थोर लोकं आहेत. त्यामुळे मी काहीतरी केलं आहे याची जाणीव मला व्हायला लागली आहे. तुम्ही ती मला करुन दिली हे मी कधीच विसरणार नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT