Sunil Holkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Holkar Passed Away: अभिनेता सुनील होळकरचे निधन

मराठीसह हिंदी टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सुनिल होळकर याचे आज (शुक्रवारी) निधन झाले आहे.

Chetan Bodke

Sunil Holkar: मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सुनील होळकर याचे आज (शुक्रवारी) निधन झाले. त्याच्या निधनाचे कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुनीलच्या निधनाचे वृत्त कळताच त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

सुनिल लिव्हर सोरायसिस या गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर अनेक उपचार करूनही प्रकृतीत कोणतीच सुधारणा झालेली नव्हती. त्याची आज (शुक्रवारी) दुपारी प्राणज्योत मालवली.

'गोष्ट एका पैठणीची', 'मोरया' या सारख्या अनेक चित्रपटांतून सुनीलने आपल्या अभिनयाची चमक दाखवली. सुनीलने हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोबतच 'मॅडम सर', 'मि. योगी' अशा अनेक मालिकांतून तर 'भुताटलेला' या वेबसीरीजमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये सोडली.

अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्याने बरीच वर्षे काम केलं. अभिनेता, निवेदक अशी त्याची ख्याती होती. जवळपास 15 वर्षांहून अधिक काळ त्याने रंगभूमीत काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब एकत्र; पाहा VIDEO

Pimpri Chinchwad : बांधकाम पाडले तर बाळाला फेकून आत्महत्या करेल; अतिक्रमण विरोधी पथकाला धमकावत शिवीगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

Shreya Bugde: श्रेया बुगडेचं स्टायलिश फोटोशूट, फॅन्सकडून सौंदर्याचं होतय कौतुक

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज! बैल शेतात गेला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण, जाब विचारणाऱ्या भावांनाही चोपलं; Video

Homa Vastu Tips: 'या' झाडांचे सुकणे कधीही टाळा, नाहीतर घरात येऊ शकते दुर्भाग्य

SCROLL FOR NEXT