Sumeet Raghavan: मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार हे त्यांच्या अभिनयाने चर्चेत असतात परंतु, इतक्यावरच न थांबता समाजातील काही घडामोडींवर देखील ते विशेष लक्ष देत असतात. मराठी सिनेसृष्टी बद्दल बोलायचे झाले तर सुमीत राघवन हा परखड अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनेता सुमीत राघवनने आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकांवरही अभिनयाची छाप पाडली आहे. त्याने नुकतेच एका विषयामुळे नेटकऱ्यांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या मेट्रो कारशेडच्या विषयावर सुमीतने आपले मत मांडले आहे. मेट्रो कारशेड हे आरे इथेच व्हावे यासाठी तो आंदोलकांना प्रचंड धारेवर धरत आहे. त्यांच्यावर चांगलीच सडकून टीकास्र सोडत आहे. मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारशेड आरे मध्येच होईल अशी घोषणा करत वादाला पुन्हा एकदा नवे वळण दिले. यावेळी आंदोलक रस्त्यावर उतरले पण सुमीत मात्र आंदोलकांवर ट्विट करून घणाघाती हल्ला करत राहिला. आज पुन्हा एकदा त्याने आंदोलकांना डिवचलं आहे.
सुमीत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले भिन्न मत- मतांतरे मांडत असतो. नुकतेच त्याने एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये एक व्हिडिओदेखील त्याने शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओने सर्वांनीच लक्ष वेधून घेतले आहे. सुमीतने शेअर केलेला व्हिडिओ, "फ्रेंचच्या नागरिकांनी वातावरण बदला विरोधात आंदोलन करणाऱ्यांची काळजी घेत आहेत, असे उपरोधिक विधान त्याने केले. मात्र व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे."
हा व्हिडिओ शेअर करुन सुमीतने फ्रेंचच्या नागरिकांची तुलना आरेतील आंदोलकांशी केली आहे. सोबतच त्याने वादग्रस्त मजकुरही लिहिला आहे. तो म्हणतो की, " आरे आंदोलकांना अशाच प्रकारची वागणूक द्यायला हवी होती. डोक्यावर चढले आहेत, बोगस फालतू लोक. कामाचे ना कामाचे, ना धामाचे.'' अशा आशयाचे ट्विट करत सुमीत भलताच चिडल्याचे दिसुन येत आहे.
सुमीतचे सोशल मीडियावर चिडण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापू्र्वीही त्याने अनेक मुद्द्यांवर आपले निर्भिड मत मांडले. त्याने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरुन प्रशासनाला चांगलेच खडेबोल सुनावले होते. त्याच्या त्या ट्विटनेही बरेच वादंग निर्माण झाले होते.
मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाच्या गोरेगावमधील आरे जंगलात होणऱ्या कारशेडला मोठ्या प्रमाणात विरोध अजूनही कायम होत आहे. मात्र अभिनेता सुमीत राघवन याचा पाठिंबा आहे. त्यानं अनेकदा उघडपणे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याच्या या विधानांमुळे आंदोलक त्याच्यावर टीका करत असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.