Subodh Bhave New Movie Muhurta Instagram
मनोरंजन बातम्या

Manapman Muhurta: संगीतप्रेमींसाठी पर्वणी, सुबोध भावेने केली आगामी चित्रपटाची घोषणा; शूटिंगलाही सुरुवात

Subodh Bhave New Movie Muhurta: ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी वसंतराव’नंतर आणखी एक सांगितिक मैफल करणारा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Subodh Bhave New Movie Shooting Start

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वत्र प्रचंड कौतुक झाले. त्या चित्रपटातील गाणी आजही तरुणांच्या स्मार्टफोनवर ऐकायला पाहायला मिळतात. ‘कट्यार काळजात घुसली’च्या माध्यमातून तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची आणि नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली.

गेल्या वर्षी सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण झाली. गेल्या वर्षी सुबोध भावेने गेल्या वर्षी आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. त्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितीक नजराणा मिळणार आहे. नुकताच त्या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला असून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली.

सर्वात आधी ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी वसंतराव’नंतर आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोधच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘मानापमान’ असं आहे. नुकताच ‘मानापमान’ या चित्रपटाचा मुहूर्त पुण्यातल्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इंस्टीट्यूटच्या कॅम्पसमध्ये पार पडला, त्यावेळेचे काही फोटो सुबोधने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओत त्याने आणखी एक चाहत्यांसाठी सांगितीक मैफल येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकतीच शूटिंगला सुरुवात झाली असून चाहत्यांना सुबोधच्या आगामी चित्रपटाबद्दल खूपच उत्सुकता आहे.

अभिनेत्याने फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “कट्यार नंतर पुन्हा एखादी संगीतमय कलाकृती सादर करावी अशी आम्हा सर्व टीमची ईच्छा होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन आज आम्ही जियो स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अ‍ॅण्ड फिल्म्स निर्मित कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या “संगीत मानापमान” या नाटकावरून प्रेरित असलेल्या, ‘मानापमान’ या आगामी संगीतमय चित्रपटाचा मुहूर्त पुण्यातील FTII च्या पवित्र जागेत केला. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद कायम असूदे, मोरया....” सोबतच सुबोधने एक व्हिडीओही शेअर केली आहे, शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, तो चित्रपटासाठी फारच उत्सुक असून शूटिंगला जोमाने सुरुवात झाली.

अद्याप चित्रपटातली स्टारकास्ट जाहीर झालेली नसून चित्रपटामध्ये कोणकोण झळकणार याबद्दल सर्वच उत्सुक आहेत. अभिनेत्याची पोस्ट पाहून फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटी मित्रांनीही त्याला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना बेहेरे, जितेंद्र जोशी, ऋतुजा बागवे, अश्विनी कासार, प्रतिक देशमुख, प्राजक्त देशमुख, निखिल राऊत अशा अनेक सेलिब्रिटींनी सुबोध भावेला आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या भूम तालुक्यातील गावातल्या शेकडो शेतकऱ्याचं रास्ता रोको

Gold Rate: सोन्याचे दर ₹८५००० पर्यंत घसरणार? आता खरेदी करावं की नाही

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT