Sharad Ponkshe SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sharad Ponkshe: नाटकादरम्यान शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले; ४० वर्षात असं पहिल्यांदाच घडलं, रंगभूमीवर नेमकं काय झालं?

Sharad Ponkshe Forget Dialogue : मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते नाटकाच्या दरम्यान संवाद विसरले. यानंतर रंगभूमीवर नेमकं काय घडले जाणून घ्या.

Shreya Maskar

मराठी अभिनेते शरद पोंक्षे कायमच आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जातात. आजवरच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांची अनेक नाटक आणि मालिका गाजल्या आहेत. त्यांची बोलण्याची रोखठोक शैली कायमच प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'पुरुष' नाटकाचा प्रयोग सुरू असताना चक्क शरद पोंक्षे संवाद विसरले. हा प्रसंग श्रुती आगाशे हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून सांगितला आहे. नाटकाचे संवाद विसरल्यानंतर शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांना थोडा वेळ मागितला. मात्र थोड्या वेळाने नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला.

सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडीओनुसार, शरद पोंक्षे यांनी संवाद विसरल्यावर थेट प्रेक्षकांना सांगितले की, "रसिकहो मी ब्लँक झालो आहे. मला काहीच आठवत नाही. मला थोडा वेळ द्याल का?"शरद पोंक्षे यांच्या विनंतीचा मान राखून प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. नाटकाचा प्रयोग पार न पडल्यामुळे आणि नाटका दरम्यान संवाद विसरल्यामुळे शरद पोंक्षे भावुक झाले. त्यांना प्रेक्षकांशी संवाद साधताना रडू अनावर झाले. ते म्हणाले की, "माझ्या 40 वर्षांच्या कारकि‍र्दीत असे पहिल्यांदाच झाले आहे"

नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी हा प्रसंग घडल्यावर कोणताही आरडाओरडा न करता शरद पोंक्षे यांच्या भावना समजून घेऊन त्यांना पाठिंबा दिला. कोणतीही तक्रार केली नाही. 'पुरुष' हे नाटक स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित आहे. जयवंत दळवी यांनी 'पुरुष' नाटक लिहिले आहे. शरद पोंक्षे हे या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIR: इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान ४२ निवृत्त न्यायाधीशांचे SIR ला समर्थन, थेट देशाच्या नावाने लिहिलं खुलं पत्र

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

90,000 पगार, तरी BMW, Volvo, 2 Mercedes कुठून आले? 3 तासांच्या सुनावणीत न्यायमूर्तींचे सचिन वाझेंना धडाधड प्रश्न; जामिनावर काय निर्णय दिला?

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

SCROLL FOR NEXT