Sanjay narvekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sanjay narvekar : मराठमोळा अभिनेता संजय नार्वेकरच्या नव्या सिनेमाची घोषणा, रंजक ट्विस्टमधून उलगडणार कहाणी

Mhanje Waghache Panje : मराठी अभिनेता संजय नार्वेकर एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय नार्वेकर यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Shreya Maskar

सध्या सिनेसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत आहेत. रंजक ट्विस्टमधून उलगडणार 'म्हणजे वाघाचे पंजे'ची आकर्षक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. दमदार स्टारकास्ट आणि कथेत ट्विस्ट असणारा हा नवा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. चित्रपटातील कलाकार एका वेगळ्याच विषयाला हाताळत कोणता संदेश देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

चित्रपटाच्या कथेबरोबर चित्रपटाची तगडी स्टारकास्ट लक्षवेधी ठरेल. तमन्ना बांदेकर हीच या चित्रपटातून पदार्पण असून सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर (Sanjay narvekar) , चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. 'म्हणजे वाघाचे पंजे' (Mhanje Waghache Panje ) या नव्याकोरा आणि रोमँटिक चित्रपट लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

त्रिशुलीन सिनेव्हिजन प्रस्तुत 'म्हणजे वाघाचे पंजे' या चित्रपटातून नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री तमन्ना बांदेकर हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली असून तिचे सिनेविश्वातील हे पदार्पण आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक स्वरूप सावंत याने उत्तमरित्या पेलवली आहे. दिग्दर्शनाबरोबर स्वरूप सावंत याने चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर संगीत हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांचे आहे. तसेच लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी बाजू सांभाळली आहे आणि हा संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार वीरधवल पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT