Marathi Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Marathi Actor Father Death : मराठी अभिनेत्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

Shreya Maskar

मराठी मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मराठमोळा अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्या भाईच्या वडिलांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने यासंबंधित पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. रमेश परदेशी यांनी आजवर अनेक चित्रपट केले आहे.

अभिनेता रमेश परदेशी यांचे वडील परशुराम लक्ष्मण परदेशी यांचे २२ ऑक्टोबरला दुपारी १२.३० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वडिलांच्या जाण्याने अभिनेत्याला धक्का बसला आहे. अनेक कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी अभिनेत्याच्या वडीलांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मित्राच्या वडीलांच्या जाण्याने मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडेही भावुक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे. पोस्टमध्ये प्रवीण तरडेंनी अभिनेते रमेश परदेशी यांच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

प्रवीण तरडेंनी पोस्टच्या कॅप्शनला लिहिलं की, "मित्राचे वडील हे सुध्दा एक खूप सुंदर नातं असतं. आपल्या मित्राच्या मैत्री बरोबर ते सुध्दा पिकत जातं. पिट्याचे वडील आज गेले शुन्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलेला माणूस. त्यांच्या सारखी डाय बनवणारा कुशल डायमेकर माझ्या पाहण्यात दुसरा नाही. लहानपणापासूनच्या खूप आठवणी आहेत त्यांच्या. मागचे सहा महिने आजारी होते. पिटयाने खूप प्रयत्न केले. पण नाही वाचवू शकला त्यांना. परमेश्वर दादांच्या आत्म्यास शांती देवो आणि पिट्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Control Tips: सकाळी ९ वाजण्यापूर्वी करा 'ही' 6 कामे, नाहीतर वाढू शकतो ब्लड प्रेशरचा धोका

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिसांचे अनुकरण करा, हायकोर्टाचे निर्देश

Weather News : राज्यात मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; आजचा हवामानाचा अंदाज काय? वाचा

Red Kumkum : केमिकल न वापरता घरच्या घरी बनवा नैसर्गिक लाल कुंकू! जाणून घ्या ७ स्टेप्स

SCROLL FOR NEXT