Pushkar shrotri On Chinmay Mandlekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushkar Shrotri: 'हिंमत असेल तर खरा चेहरा घेऊन समोर या...'; चिन्मय मांडलेकरला ट्रोल करणाऱ्यांना पुष्कर श्रोत्रीचं चॅलेंज

Pushkar shrotri On Chinmay Mandlekar Trolling: मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या खूप चर्चेत आहे. चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कधीच साकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. चिन्मय मांडलेकरच्या या निर्णयावर चित्रपटसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेदेखील आपले मत मांडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)सध्या खूप चर्चेत आहे. चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरुन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कधीच साकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. चिन्मय मांडलेकरच्या या निर्णयावर चित्रपटसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीनेदेखील (Pushkar Shotri) आपले मत मांडले आहे.

पुष्कर श्रोत्रीने माध्यमांना सांगितले की, 'चिन्मय मांडलेकरने त्याच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवले म्हणून तो त्याच्यावर वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कृतीचेच संस्कार करतोय, आजच्या परिस्थितीचा विचार करुन तो आपल्या मुलाचे संगोपन करत करतोय, त्याला वाईट गोष्टीपासून लांब राहण्यास शिकवतोय, चांगल्या गोष्टी शिकवतोय, मग मुलाच्या नावाने काय फरक पडतो?'

'तुम्ही एखाद्या मुलाला त्याच्या नावावरुन ट्रोल करणार असाल तर तुम्हाला इतिहास माहितीये का? जहांगीर नाव ठेवण्यामागचे कारण त्याने आधीच सांगितले होते. तुम्ही जरा इतिहास बघा, हिम्मत असेल तर खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाउंट्स बनवून ट्रोल करणार... तुम्हाला किती महत्त्व द्याचं?', असं पुष्कर श्रोत्रीने म्हटलं आहे.

चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यापुढे कधीही करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चिन्मय मांडलेकरच्या या निर्णयाबाबत मराठी चित्रपटसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

SCROLL FOR NEXT