Prathamesh Parab News, Manoranjan News Twitter/ @pprathameshp
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab: प्रथमेश लग्नासाठी उतावळा?, नवरदेवाच्या लुकमध्ये फोटो शेअर करत चाहत्यांना दिले आमंत्रण...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकत आहेत.

Chetan Bodke

Prathamesh Parab: सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकत आहेत. अनेक कलाकारांनी डिसेंबर महिना आपले लग्न आटोपण्याचा उत्तम पर्याय निवडला आहे. त्यातच आणखी एक कलाकार लग्नबेडीत अडकणार अशी चर्चा होत आहे. तो कलाकार म्हणजे दगडू उर्फ प्रथमेश परब.(Manoranjan News)

प्रथमेशने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटो वरून त्याच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या फोटोमध्ये प्रथमेशने नवरदेवासारखे कपडे घातले आहे. या फोटोत शेरवानी घालून, डोक्याला मुंडावळ्या बांधून आणि हातात हार घेऊन प्रथमेश फोटोत उभा आहे.

सोबतच त्याने आपल्या चाहत्यांना थेट लग्नाचं आमंत्रणही दिलंय. “आमचं ठरलं आहे. लग्नाला यायचं हं…” अशा आशयाचे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे. प्रथमेशच्या या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे प्रथमेश विवाहबद्ध होणार या चर्चेला सोशल मीडियावर बरेच उधाण आले आहे.

“सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा!” असे म्हणत प्रथमेशने फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहत असे समजत आहे की, कदाचित त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा असावी. त्याच्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

2022 हे वर्ष प्रथामेशसाठी फारच खास होते. त्याचे बरेच चित्रपट या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. प्रथमेशला 'टाईमपास'मुळे बरीच प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रात मराठी माणसांची मुस्कटदबी सुरू, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

MNS Protest: नेत्यांची धरपकड, पोलिसांनी परवानगी नाकारली; मीरा-भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा निघणार की नाही?

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच पोलिसांनी अविनाश जाधवांना घेतलं ताब्यात|VIDEO

गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्च्याला परवानगी, मराठी लोकांना का नाही? मनसेचा सरकारला संतप्त सवाल, मीरा भाईंदरचे वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT