Prashant Damle Mother Death Saam tv
मनोरंजन बातम्या

Prashant Damle Mother Death: प्रशांत दामलेंना मातृश्लोक, विजया दामलेंचे ९२ व्या वर्षी निधन

Vijaya Damle Death: विजया दामले या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे दामले कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Priya More

Marathi Actor Prashant Damale Mother: मराठी चित्रपट (Marathi Film Industry) आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले (Actor Prashant Damle) यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांचे राहत्या घरी निधन झाले.

विजया दामले या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे दामले कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रशांत दामले हे नाटकाच्या प्रयोगासाठी मुंबई बाहेर होते. त्याचवेळी त्यांना आईच्या निधनाची माहिती समजली. त्यानंतर ते नाटकाचे प्रयोग थांबवून थेट मुंबईला आले. त्यानंतर त्यांच्या आईच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत दामले यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रामध्ये दमदार अभिनयच्या जोरावर स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केले आहे. मराठी रंगभूमीवर नाटकांच्या प्रयोगांचे विक्रम प्रशांत दामले यांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी १२,५०० प्रयोगांचा टप्पा ओलांडला होता. प्रशांत दामले हे त्यांचे प्रसिद्ध ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगसाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. पण त्याचपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले.

प्रशांत दामले यांचा नाटकासाठीचा हा अमेरिका दौरा ८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ असा होता. प्रशांत दामले यांनी काम केलेली आतापर्यंतची सर्वच नाटकं सुपरहिट ठरली आहेत. त्यांच्या प्रत्येक नाटकांना प्रेक्षक मोठी गर्दी करतात यात काही शंका नाही. प्रशांत दामले यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यात आता आईचे देखील निधन झाले. त्यामुळे प्रशांत दामले पोरके झाले आहेत. प्रशांत दामले हे नेहमी आपल्या यशाचं सारं श्रेय आई आणि पत्नीला द्यायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

MLC Election : परभणी-हिंगोलीसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला, श्रीकांत शिंदेंच्या विश्वासूला संधी; नेमकं गणित काय?

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Weekly Horoscope: तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Fatty Liver Disease: देशातील 38% लोक फॅटी लिव्हरच्या समस्येने ग्रस्त, शरीरात दिसणारी ही 5 लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT