Nana Patekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: "अशोकने मला चेक दिला अन्..." नाना पाटेकरांनी सांगितला पडत्या काळातील मैत्रीचा तो किस्सा

Nana Patekar And Ashok Saraf Friendship: नाना पाटेकर हे कायम अशोक सराफ यांनी केलेल्या मदतीविषयी बोलत असतात. अभिनेते नाना पाटेकर यांनी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सांगितला.

Manasvi Choudhary

अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. मराठीसह हिंदी विश्व गाजवणारे हे दोन्ही अभिनेते अनेकदा त्यांच्या मैत्रीविषयी व्यक्त होतात. हमीदाबाईची कोठी या नाटकादरम्यान त्यांची मैत्री झाली ती आजही कायम आहे. आजही नाना पाटेकर त्यांच्या मैत्रीविषयी व्यक्त होतात. एकमेकांच्या सुख:दुखात धावून येणारी ही मंडळी आजही एकमेकांच्या आठवणीत रमतात. याचदरम्यानचा किस्सा अभिनेते नाना पाटेकर यांनी चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सांगितला.

नाना पाटेकर हे कायम अशोक सराफ यांनी केलेल्या मदतीविषयी बोलत असतात. हमीदाबाई कोठी नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, नाटक करताना मला ५० रूपये मिळायचे आणि अशोक सराफला २५० रूपये मिळायचे. यावेळी या पडत्या काळात अशोकने मला पैशांची खूप मदत केली. नाटकांच्या मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो.यावेळी मला पैसे मिळावे म्हणून अशोक मुद्दाम हारायचा मला ते कळायचं तो मुद्दाम हरतोय पण तेव्हा मला पैशांची गरज होती.

गणपतीची आठवण सांगताना नाना म्हणाले, एकदा गणपतीत माझ्याकडे पैसे नव्हते. यावेळी खर्च कसा करायचा असा प्रश्न माझ्या मनात असताना. सकाळी सहा वाजता अशोक फिल्मसिटीला शुटिंगला चालला होता. यावेळी मला भेटला म्हणाला हा चेक घे बॅकेत १५ हजार आहेत. तुला पाहिजे तेवढे पैसे घे .मी तीन हजार रूपये काढले होते. त्याच्यानंतर मला फार काही वर्ष देता आले नाही काही वर्षानंतर पुन्हा एकत्र चित्रपटात काम करत असताना मी त्याला पैसे दिले यावेळी अशोकने काय पाटेकर पैसेवाले झाले मी म्हणालो पैसेच परत करतोय, वेळ परत नाही करू शकत. अशी आठवण नाना पाटेकर यांनी आठवण सांगितली.

याच कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने अशोक मामा आणि नाना पाटेकरांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली की, या दोघांची ना फार स्पेशल गोष्ट आहे ती अशोक सराफ आणि नाना सरांची. ते दोघेंही कुठेही शुटिंग करून कुठेही प्रयोग करूदे यावेळी नाना सर न बोलता अशोक सराफ यांची मालिश करतात आणि नाना पाटेकर त्यांना बिदाई देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT