Navardev Bsc Agri Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navardev Bsc Agri: शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!, 'नवरदेव - Bsc Agri’चा दमदार ट्रेलर रिलीज

Navardev Bsc Agri Movie: नव्या वर्षातही जबरदस्त कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'नवरदेव (Bsc Agri)’. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुत आहे.

Priya More

Navardev Bsc Agri Movie Trailer:

मराठी सिनेसृष्टीमध्ये सामाजिक असो वा राजकीय असो तसंच प्रेम प्रकरण असो अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारीत अनेक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २०२३ हे वर्ष मराठी सिनेरसिकांसाठी खास ठरले. या वर्षात वेगवेगळ्या विषयांवर आधारीत अनेक चित्रपट रिलीज झाले.

आता नव्या वर्षातही जबरदस्त कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'नवरदेव (Bsc Agri)’. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुत आहे. अशामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर (Navardev Bsc Agri Trailer) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न... याच मनाला स्पर्श करणाऱ्या विषयाला हात घालणारा चित्रपट 'नवरदेव (Bsc Agri)’ येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

'नवरदेव (Bsc Agri)’ या चित्रपटामध्ये तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत अभिनेता क्षितीश दाते पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. शेतकरी असणाऱ्या क्षितीशला नवरी म्हणून प्रियदर्शिनी मिळणार की नाही हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. बी. एस. सी. अॅग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. चित्रपटातील तरूण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करुन प्रगत शेती करतोय, जिद्दीने लढायला शिकवतोय. मात्र, असे असूनही नवरीचे आई-वडिल नोकरदार मुलांनाच आपल्या मुली देऊ इच्छितात. या सगळ्या अडचणींवर मात करत शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात मळा फुलवणार का? हे २६ जानेवारीलाच कळेल.

दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. या चित्रपटामध्ये क्षितीश दाते आणि प्रियदर्शिनी इंदलकरसोबत अभिनेता प्रविण तरडे, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे हे कलाकार महत्वाच्या भूमिकेमध्ये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT