Kiran Mane Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane: असा नेता यापूर्वी कधी झाला नाही आणि..., शरद पवारांचा VIDEO पोस्ट करत किरण मानेंची खास पोस्ट

Kiran Mane Post Viral: सभेसाठी आलेल्या शरद पवार यांचे भाषण सुरू असताना गर्दीतून त्यांना एक कार्यकर्ता आवाज देतो. त्यावेळी शरद पवार त्या व्यक्तीच्या आवाजावरून त्याला ओळखतात. हा व्हिडीओ शेअर करत किरण माने यांनी शरद पवारांसाठी पोस्ट लिहिली आहे.

Priya More

Kiran Mane Special Post For Sharad Pawar:

मराठमोळा अभिनेता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेत किरण माने (Kiran Mane) नेहमी चर्चेत असतात. किरण माने हे नेहमी कोणत्याही विषयांवर स्पष्टपणे मत मांडत असतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारे किरण माने हे नेहमी काही ना काही विषयांवर पोस्ट करत असतात. मग तो विषय राजकीय असो, सामाजिक असो वा मनोरंजनाचा असो. त्यांना आलेला अनुभव, त्यांना भेटलेली व्यक्ती यांच्याबद्दल अनेकदा ते सोशल मीडियावर व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत अनुभव शेअर करतात. नुकताच त्यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा व्हिडीओ पोस्ट करत भली मोठी पोस्ट लिहिली आहे.

सभेसाठी आलेल्या शरद पवार यांचे भाषण सुरू असताना गर्दीतून त्यांना एक कार्यकर्ता आवाज देतो. त्यावेळी शरद पवार त्या व्यक्तीच्या आवाजावरून त्याला ओळखतात. हा व्हिडीओ शेअर करत किरण माने यांनी शरद पवारांसाठी पोस्ट लिहिली आहे. यामाध्यमातून त्यांनी शरद पवारांचे कौतुक केले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'नुस्त्या आवाजावरनं पवारसाहेबांनी कार्यकर्त्याचं नांव ओळखलं! ते अचूक निघालं!! काय अजब रसायन आहे राव हे... 83 पेक्षा जास्त वय असलेल्या माणसाला जवळच्या नातेवाईकांची नावं आठवत नाहीत गड्याहो... अद्भूत स्मरणशक्ती... अफलातून उत्साह... तुम्ही पवारविरोधक किंवा द्वेष्टे असा, तुम्हाला या माणसाच्या या गोष्टींचीही तारीफ करता येत नसेल तर तुमची जिंदगी झंड आहे. आयुष्य नफरतीने चडफडत काढणार तुम्ही.'

किरण मानेंनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, 'माझ्या कॉन्ट्रोव्हर्सीच्या वेळी पवारसाहेबांनी मला भेटायला बोलावलंवतं, तेव्हा त्यांच्या केबीनमध्ये दीड तास त्यांनी माझ्याशी चर्चा केली. अनेक विषय निघाले. तिथे फक्त साहेब, मी आणि प्रतापराव आसबे, तिघेच होतो. त्या दीड तासांवर मी एक छोटेखानी पुस्तक लिहू शकेन... खरंतर तेव्हापास्नं बर्‍याचजणांचा गैरसमज आहे की मी सायबांचा माणूस आहे... लै हसतो मी अशा कमेंटस् वाचल्यावर. मला साहेबांविषयी आदर आहे तो अशा या व्हिडीओत असलेल्या जगावेगळ्या गोष्टींमुळे.'

तसंच, 'राजकारणी म्हणून मी अनेकदा टीकाही करतो. पण मी अभिनेता आहे. कुठलाही माणूस बारकाईनं बघतो. निरीक्षणातनं अंतर्बाह्य स्वभाव ओळखण्याचा छंद आहे मला. साहेबांना मी माझ्या लहानपणापास्नं बघतोय. त्यांच्या अनेक गोष्टींवर मी पोस्टस् लिहील्या आहेत. त्या सगळ्या पोस्टमध्ये 'माणूस' म्हणून त्यांचं वेगळेपण रेखाटलेलंच दिसेल तुम्हाला. कुठेही अंधभक्ती नाही दिसणार. अंधभक्त असतो तर त्यांच्या पक्षात प्रवेश केला नसता का मी? लव्ह हिम ऑर हेट हिम... पवारसाहेबांसारखा नेता यापूर्वी कधी झाला नाही, यापुढेही होणार नाही!'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT