Kiran Gaikwad Saam Tv
मनोरंजन बातम्या

Naad- The Hard Love : 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडला लागलाय कुणाचा तरी 'नाद', कोण आहे ती?

Naad- The Hard Love Movie: मालिकांमध्ये काम करता करता किरण गायकवाडला चित्रपटांमध्ये देखील जबरदस्त भूमिका मिळत गेल्या. आता किरण गायकवाड मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेतून चाहत्यांचे मन जिंकतो. अशामध्ये किरण गायकवाडने आपल्या चाहत्यांना नववर्षात जबरदस्त गिफ्ट दिलं आहे.

Priya More

Actor Kiran Gaikwad:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'देवमाणूस'मधून (Devmanus Serial) घराघरामध्ये पोहचलेला अभिनेता किरण गायकवाड (Actor Kiran Gaikwad) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. डीजे ते मुख्य अभिनेता असा किरण गायकवाडचा अभिनयातील प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. मालिकांमध्ये काम करता करता किरण गायकवाडला चित्रपटांमध्ये देखील जबरदस्त भूमिका मिळत गेल्या. आता किरण गायकवाड मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेतून चाहत्यांचे मन जिंकतो.

अशामध्ये किरण गायकवाडने आपल्या चाहत्यांना नववर्षात जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. किरण लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नाद - द हार्ड लव्ह' असं किरणच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.

किरण गायकवाडला सध्या कोणाचा तरी 'नाद' लागला आहे. हा 'नाद' कोणाचा आहे हे लवकरच समजणार आहे. किरणच्या 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला असून शूटिंगला सुरुवात देखील झाली आहे. शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्थांतर्गत 'नाद'ची निर्माती करण्यात येत आहे. संजय बाबुराव पगारे आणि रुपेश दिनकर पगारे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' फेम प्रकाश जनार्दन पवार हे या चित्रपटचे दिग्दर्शन करत आहेत.

भोरमध्ये 'नाद'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी निर्मात्यांनी मुहूर्ताच्या शॉटसाठी क्लॅप दिला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली. 'नाद - द हार्ड लव्ह' या शीर्षकावरूनच या चित्रपटात एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या परीने प्रेमकथा सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं असलं तरी प्रत्येक चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो. 'नाद' या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याचं गुपित सध्या गुलदस्त्यात आहे. पण ते लवकरच उघड होईल.

'नाद' या चित्रपटाची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केले आहे. डॉ. विनायक पवार यांनी वैभव देशमुख यांच्या साथीने गीतलेखनही केलं असून त्यांच्या संगीतरचना संगीतकार पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. डिओपी अमित सिंह या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून, कला दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश चिपकर यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे या तारखेची अद्याप घोषणा करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Crime: अनैतिक संबंधात अडसर, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; नागपुरमध्ये खळबळ

Beed : ...नाहीतर तुझी बायकोला घरी पाठव, बीडमध्ये व्यापार्‍याने केली आत्महत्या, भाजप नेत्याला अटक

Blue Number Plate: कोणत्या गाड्यांना निळ्या नंबर प्लेट दिल्या जातात आणि का? वाचा त्यामागील खास कारणे

Navi Mumbai : नवी मुंबईतील बस आगारात भीषण आग; नेमकं काय घडलं? | VIDEO

SCROLL FOR NEXT