Atur Parchure Fight Cancer Instagram
मनोरंजन बातम्या

Atul Parchure : लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी कॅन्सरचं निदान झालं... अभिनेते अतुल परचुरेंनी शेअर केली त्यांची लढाई

Atur Parchure Fight Cancer : अतुल परचुरे यांना कॅन्सरचे निदान झाले होते.

Pooja Dange

Atul Parchure opens up about cancer diagnosis : अभिनेते अतुल परचुरे मराठी सिनेविश्वातील एक मोठं नाव आहे. अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील काम केले आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून का, करायला सुरुवात केली, त्यानंतर अनेक नाटक, मालिका सिनेमे यांमध्ये अतुल परचुरे यांनी काम केलं.

अतुल परचुरे काही काळ अभिनयापासून दूर आहेत. याबाबत अतुल परचुरे यांनी सिनेप्रत्रकार सौमित्र पोटे यांना दिलेल्या मुलखातील सांगितले आहे.

अतुल परचुरे यांना कॅन्सरचे निदान झाले होते. यामुळे अतुल परचुरे यांच्या चाहत्यांना आणि तमाम मराठी रसिकांना धक्का बसला आहे. (Latest Entertainment News)

कोणालाच माहीत नव्हते की अतुल कॅन्सरशी लढत आहेत. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीतील याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. मुलाखतीत अतुल यांनी सांगितले की, "माझ्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली होती. आम्ही न्यूझीलंडला गेलो तेव्हा मला काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती.

मी खवय्या आहे. त्यामुळे मला हे थोडं विचित्र वाटलं. मला मळमळ होत होती आणि मला कळले. काहीतरी गडबड होते. डॉक्टरांकडे गेल्यावर मला अल्ट्रासोनोग्राफी करायला सांगितली. डॉक्टरांनी ते केले तेव्हा मला त्याच्या डोळ्यात भीती दिसली.

मला डॉक्टरांनी सांगितले की, माझ्या यकृतात सुमारे 5 सेंटीमीटर लांबीची गाठ आहे आणि ती कर्करोगाची आहे. मी त्यांना विचारलं, मी बरा होईन की नाही" (Celebrity)

पुढे डॉक्टरांनी कॅन्सर स्पेशलिस्टला भेटा असं परचुरेंना सांगीतलं. पुढे मग ट्युमर झालाय याचं निदान झालं. घरी आल्यानंतर परचुरेंनी सर्वात आधी आईला ही गोष्ट सांगितलं.

परचुरे (Actor) आईला म्हणाले.. डॉक्टर म्हणत आहेत की दोन-तीन प्रोसिजर्स आहेत ते झालं की तुमच्या लिव्हरची साईझ वाढेल मग आपण ते काढून टाकू.

आईने हे ऐकल्यावर काळजी करु नकोस असं सांगीतलं. पुढे पत्नी सोनियाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तेव्हाही तिनेही अतुल यांना धीर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT