Kiran Mane Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane: एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना..., किरण मानेंनी गाण्यातून कोणावर साधला निशाणा?

Kiran Mane On Uddhav Thackeray Shivsena Group: एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळख असलेल्या किरण मानेंनी आता राजकारणामध्ये एन्ट्री केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये (Shivsena Uddhav Thackeray Group) एन्ट्री केली.

Priya More

Kiran Mane Video:

मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या चित्रपट, मालिकांसोबतच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. किरण माने सोशल मीडियावर पोस्ट करत नेहमीच स्पष्टपणे बोलताना दिसतात. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळख असलेल्या किरण मानेंनी आता राजकारणामध्ये एन्ट्री केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये (Shivsena Uddhav Thackeray Group) एन्ट्री केली. नुकताच त्यांनी शिवेसेनेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी जबरदस्त गाणं गायलं. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी थेट शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीवर निशाणा साधला आहे.

किरण माने यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते गाणं गाताना दिसत आहेत. त्यांनी हे गाणं पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना...' परवा सिंदखेडराजा इथं शिवसेनेच्या 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहीमेचा उद्घाटक म्हणून मी गेलो होतो... माझ्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानची एक आठवण सांगताना माझा मित्र विनायक पवार याचं हे भन्नाट गाणं मी ऐकवलं. ऐका.'

किरण माने यांनी गायलेलं गाणं -

एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना

आरं येडं पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना

आरं खुळ पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना

कसा खोटा जमाना आला रं

झालं इमान भाजीपाला रं

वाघ जाळ्यात अडकून गेला रं

आन् ऐटीत फिरतोय कोल्हा रं

आरं हरीश्चंद्राचं सोंग घेऊनी आला शकुनीमामा

शेंबडं पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना

आहे माझ्या देशाची शान रं, माझं पवित्र संविधान रं

दोन गुजरात्यांच्या हाती रं आज सारंच पडलंय गहान रं

अगर तुमच्या उरावर हुकूमशाही, माना अगर न मारा

उभा महाराष्ट्र सांगतोय रं, कुनाची हाय शिवसेना

किरण माने यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका चाहत्यांनी कमेंट्स करत लिहिले की, 'दादा तुमच्यावर कोणी किती टीका करू दे, उद्धव ठाकरेंच्या पडत्या काळात तुम्ही उभे राहिले , अशा शिलेदारांची आज गरज आहे शिवसेनेला' तर आणखी एकाने कमेंट्स करत लिहिले की, 'टोचणारी सत्यता मांडली किरणदादा.. असेच कार्यकर्ते हवे आहेत आज आपल्या भारताला... पुढं पुढं करून मोठं होणारे एक दिवस पायी नक्कीच तुडवले जाणार'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT