Ajay Purkar On Bastar Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ajay Purkar On Bastar Film: " 'त्या' सगळ्या लोकांचा होणार पर्दाफाश...", 'बस्तर' पाहून अजय पूरकरांचं परखड मत

Bastar Film: ‘बस्तर: द नॅक्सल स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर मराठमोळा अभिनेता अजय पुरकर यांनी एक व्हिडीओ शेअर केली आहे. यावेळी अभिनेत्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले असून त्यांनी चित्रपटाबद्दल आपलं रोखठोक मत मांडले आहे.

Chetan Bodke

Ajay Purkar On Bastar Film

नक्षलवाद विषयावर थेट भाष्य करणारा ‘बस्तर: द नॅक्सल स्टोरी’ नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अदा शर्मा असून चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ‘बस्तर: द नॅक्सल स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर मराठमोळा अभिनेता अजय पुरकर यांनी एक व्हिडीओ शेअर केली आहे. यावेळी अभिनेत्याने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले असून त्यांनी चित्रपटाबद्दल आपलं रोखठोक मत मांडले आहे. (Bollywood Film)

अजय पुरकर यांनी चित्रपटाबद्दलची व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये अजय पुरकर म्हणतात, " काल ‘बस्तर: द नॅक्सल स्टोरी’ नावाचा झंझावात बघितला.. अदा शर्मा आणि इंदिरा तिवारी या मुलींनी जबरदस्त काम केलंय. सुदिप्तो सेन यांनी ‘द केरला स्टोरी’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर कमाल सादर केली आहे. निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी चित्रपटाची मांडणी खूप उत्तम रित्या केली आहे. संपूर्ण भारतीयांनी हा चित्रपट बघा. आणि तुम्हीच नका बघू तर तुमच्या मुलांनाही हा चित्रपट दाखवा. देशात आतून जी कीड लागलीय, जी वाळवी लागलीय, ती वाळवी संपूर्ण देश पोखरत आहे ना त्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश या चित्रपटातून करण्यात आला आहे..." (Marathi Actors)

आपल्या व्हिडीओमध्ये अजय पूरकर पुढे म्हणतात, "त्यामुळे आपल्या आजूबाजूला आहेत, शाळा-कॉलेजमध्ये आहेत, आपण जिथे काम करतो तिथे आहेत, आपण ज्या इंडस्ट्रीत आपण काम करतो तिथे अशी लोकं आहेत. या सगळ्यापांसून सावध राहा. तुमच्या मुलांनाही सावध राहायला सांगा. हा देश संपवतील ही लोकं. 'बस्तर - द नक्सल स्टोरी' या चित्रपटाने त्या लोकांच्या सणसणीत कानफडात मारली आहे." असं परखड मत अजय पूरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच अजय पुरकर यांनी चाहत्यांना 'बस्तर' चित्रपट पाहण्याचं आवाहनही केलंय.(Bollywood Film)

निर्माता विपुल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या यशानंतर आता अदा शर्मा 'बस्तर द नक्सल स्टोरी' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. 'बस्तर द नक्सल स्टोरी'मध्ये अदा शर्मा आयपीएस नीरजा माधवनची भूमिका साकारताना दिसणार आहे. सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली अशिन ए. शाह यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

Maharashtra Live News Update : गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, ख्रिस्ती बांधवांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

Karachi building collapse : पाकिस्तानात चमत्कार! इमारत कोसळून हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू, पण 'ती' आश्चर्यकारकरित्या बचावली

Shopping For Ladies: प्रत्येक महिलेने स्वतःसाठी खरेदी करायला हव्या 'या' महत्वाची गोष्ट

Maharashtra Politics: अजित पवारांनी बैठक रद्द का केली? कोणता दलाल आडवा आला? – नाना पटोलेंचा विधानसभेत घणाघात| VIDEO

SCROLL FOR NEXT