Abhijeet Kelkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Maharashtra Assembly Election Result: देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने अभिनंदनाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. नेमकं तो काय बोला जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पैकी नागपूर दक्षिण- पश्चिमच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. राज्यात भाजपला जे यश मिळाले आहे त्यासाठी सर्वत्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. भाजप हा राज्यातील सर्वाधिक उमेदवार असलेला पक्ष आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने (Abhijeet Kelkar) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

अभिजीतने देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर "असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होत नाही, पौर्णिमेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही." असे लिहिलं आहे. तर कॅप्शनमध्ये अभिजीतने "धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला…देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपलं मनापासून त्रिवार अभिनंदन" असे लिहून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठी अभिनेता अभिजीत केळकरने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तो स्पष्टवक्ता अभिनेता आहे. आपल्या बोलण्याने त्याने बिग बॉसच्या घरातही जादू केली होती. अभिजीतने अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली आहे.

स्वतः अभिजीत केळकरने भाजपामध्ये प्रवेश केला होता. तो नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली मते ठाम मांडतो. अभिजीत केळकरची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

SCROLL FOR NEXT