Manushi Chhillar Instagram/@manushi_chhillar
मनोरंजन बातम्या

Manushi Chhillar: मानुषी छिल्लरच्या दिलखेचक अदा, फोटोवरुन नजर हटता हटेना

मानुषी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येऊ लागली आहे.

Pooja Dange

Manushi Chhillar New Photo: बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. हा किताब जिंकल्यानंतर ती सतत चर्चेत येऊ लागली. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या लूकमुळे मानुषीने प्रत्येकवेळी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मानुषीने जेव्हापासून बॉलिवूडच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सची संख्या खूपच वाढली आहे. तिने केवळ अभिनयानेच नाही तर तिच्या बोल्ड लूकनेही लोकांना वेड लावले आहे.

मानुषी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येऊ लागली आहे, तर दुसरीकडे तिच्या लूकने तिने लोकांना तिची दाखल घेण्यास भाग पडले आहे. मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड लूक नेहमीच चाहत्यांसमोर घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती एथनिक लूकमध्ये दिसत आहे.

मानुषीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नसली आहे. तसेच तिने डिपनेक ब्लाउज घातला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे न ठेवता त्यांची पोनी बांधली आहे. (Celebrity)

यासोबत तिने गळ्यालगत नेकपीस कॅरी केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. मानुषीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मानुषीने फोटो शेअर करत 'बिलिव्ह इन मॅजिक' असे कॅप्शन दिले आहे. आता ही जादू कसली आहे ज्यावर मानुषी विश्वास ठेवायला सांगते आहे, हे मानुषीच आपल्याला सांगू शकेल. (Social Media)

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि गोड दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे. लोकांनी कौतुक करताना तिच्यावर कमेंट वर्षाव केला आहे. मानुषीने या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सध्या मानुषी अभिनेत्री तिच्या आगामी 'तेहरान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ई-बाँडची घोषणा करताच विरोधकांचा हल्लाबोल; पाहा VIDEO

'तुझे न्यूड फोटो पाठवतेस का?', गेम खेळताना आला मेसेज अन्...; Akshay Kumar ने सांगितला मुलीसोबत घडलेला भयानक प्रसंग

Sangli Crime : सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

Chikungunya: अरे बापरे! ५१ लाख भारतीयांना दरवर्षी चिकनगुनियाचा धोका; नेमका आजार आहे काय? जाणून घ्या लक्षणं

26/11 मुंबई हल्ल्यात शौर्य दाखवणाऱ्या NSG कमांडोला अटक, २०० किलो गांजासह ATS ने रंगेहाथ पकडले

SCROLL FOR NEXT