The Family Man Season 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Family Man 3: चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली, मनोज वाजपेयीनं स्वतः पोस्ट केला VIDEO

वेबसीरिज स्टारर मनोज बाजपेयीने अखेर चाहत्यांची उत्सुकता संपवली असून तिसऱ्या सीझनच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

Chetan Bodke

The Family Man 3: अखेर तो क्षण आला... बहुचर्चित फॅमिली मॅन या वेबसीरिजची ओटीटी विश्वात कमालीची चर्चा सुरु आहे. आता पर्यंत या वेबसीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आता अखेर प्रतिक्षा आहे ती 'फॅमिली मॅन ३'ची. वेबसीरिज स्टारर मनोज बाजपेयीने अखेर चाहत्यांची उत्सुकता संपवली असून तिसऱ्या सीझनच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

चित्रपट निर्माते राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या नेतृत्वाखाली मनोज बाजपेयी अभिनीत 'द फॅमिली मॅन' 2019 मध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. गेल्या वर्षी लॉंच झालेल्या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून तेव्हापासून चाहत्यांना तिसऱ्या सीझनबद्दल माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे. आता मनोज बाजपेयीने अखेर चाहत्यांची उत्सुकता संपवली असून तिसऱ्या सीझनच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, मनोज बाजपेयी त्याच्या कुटुंबासोबत प्रेक्षकांसमोर येत असल्याचे सांगितले. शेअर केलेल्या व्हिडिओला मनोजने "कुटुंब" के साथ आ रहा हूँ... स्वागत नहीं करोगे हमारा? " त्याच्या पोस्टला अशा आशयाचा कॅप्शन देत शेअर केले. चाहतेही या वेबसीरिजच्या आगामी भागासाठी बरेच उत्साही आहेत.

यापूर्वी, राज आणि डीके यांनी 'द फॅमिली मॅन 3' बद्दल सांगितले की त्यांच्याकडे वेब सीरिजसाठी कल्पना आणि संकल्पना असताना, ते सध्या फीडबॅक घेत आहेत. याबद्दल बोलताना राजने सांगितले की, “आपल्याकडे यावेळी मोठा प्रेक्षकवर्ग आहे, आपल्याकडे संकल्पना आहे, आपल्याकडे कल्पना आहे असून आता सर्वांनाच वेबसीरिज उत्सुकता आहे. पण आम्ही अजूनही कथा विकसित करत आहोत. यावेळी, आम्ही प्रत्यक्षात फीडबॅक घेत आहोत. सर्व पुन्हा एकत्र बसून आपल्या डोक्यातील विचार सर्वांसोबत शेअर करत सर्व बसून ते लिहिणे सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्यावर फारसा प्रभाव पडू नये, परंतु तरीही आपण काय चांगले आहे आणि काय नाही याची जाणीव ठेवू शकतो.”

दरम्यान, द फॅमिली मॅन 2 मध्ये मुख्य भूमिका साकारणारा मनोज बाजपेयी या मालिकेच्या यशाने भारावून गेला आहे. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने सांगितले, “होय, आम्हाला माहित होते, आमच्या हातात खूप चांगले उत्पादन आहे, परंतु तरीही, कोणीही अशा प्रकारच्या प्रेमाची आणि स्वागताची कल्पना करू शकत नाही. सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया ही त्याची साक्ष आहेत.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT