Manoj Bajpayee On The Family Man 3
Manoj Bajpayee On The Family Man 3 Instagram
मनोरंजन बातम्या

Manoj Bajpayee On The Family Man 3: मनोज बाजपेयींनी ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनबद्दल दिली महत्वाचे अपडेट

Chetan Bodke

Manoj Bajpayee On The Family Man 3

मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरीजची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला या वेब सीरिजचे २ सीझन आले होते, आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिसऱ्या सीझनची. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन ३’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता नुकतीच अभिनेता मनोज वाजपेयीने वेब सीरिजबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. (Bollywood)

मध्यंतरी सोशल मीडियावर वेब सीरिजची जोरदार चर्चा होत होती. प्रेक्षकांना वेब सीरिजबद्दल प्रचंड आतुरता आहे. नुकतंच मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीत वेब सीरिजबद्दल चाहत्यांना अपडेट दिली आहे. “वेब सीरिजचा दुसरा सीजन रिलीज होऊन दोन वर्ष झाली आहेत. मला माहित सर्वचजण आता आगामी एपिसोडची वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसीरिजवर काम सुरु आहे. वेबसीरिजचे निर्माते राज आणि डिके यांना वेबसीरीजचा तिसरा सीझन जास्त घाई- गडबडीत आणायचा नाही.” (OTT)

“सीझन १ आणि सीझन २ मध्ये जवळपास तीन वर्षांचा गॅप होता. तेवढाच वेळ आम्हाला तिसऱ्या सीझनसाठीही हवा आहे, अशी अपेक्षा आमची आहे. मी चाहत्यांना इतके सांगू शकतो, सीझन २ पेक्षा सीझन ३ तुमचं सर्वात जास्त मनोरंजन करेल.” अशी प्रतिक्रिया मनोज वाजपेयीने दिली आहे. या वेबसीरीजचे आतापर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. (Web Series)

फॅमिली मॅनचे दोन्हीही सीझन ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झालेले आहेत. वेबसीरीजमध्ये मुख्य भूमिकेत, मनोज वाजपेयी, प्रियामणी, अश्लेशा ठाकूर, समांथा रुथ प्रभू, श्रेया धन्वंतरी, शरीब हाश्मी, नीरज माधव, सन्नी हिंदुजासह अनेक स्टारकास्ट दिसणार आहेत. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT