Shah Rukh Khan Expensive Things: बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अनेक यश संपादन केले आहे. त्याने आपल्या अभिनयातून केवळ प्रसिद्धीच मिळवली नाही तर अमाप संपत्तीही मिळवली आहे. आज तो एका चित्रपटासाठी करोडो रुपये इतके मानधन घेतो. याशिवाय त्याच्या उत्पन्नाचे इतरही स्रोत आहेत, जिथून त्याला भक्कम उत्पन्न मिळते. शाहरुख खानची देश-विदेशात करोडो रुपयांची संपत्ती आहे. शाहरुख खानकडे आज अनेक महागड्या गाड्या, महागडे घड्याळं अशा बऱ्याच वस्तु त्याच्याकडे आहेत.
शाहरुख खानचे मुंबईतील सी-फेसिंग घर मन्नत नेहमीच चर्चेत असते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने हा बंगला तब्बल 13 कोटींना खरेदी केले आहे, त्याची किंमत सध्या 200 कोटी रुपये इतकी आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि अबरामसह या आलिशान घरात राहतो.
शाहरुख खानचा दुबईतील पाम जुमेराह येथे एक आलिशान घर देखील आहे. ज्याची किंमत 100 कोटी रुपये इतकी आहे. दुबईस्थित प्रॉपर्टी डेव्हलपर नखील यांनी हा व्हिला शाहरुख खानला 2007 साली भेट म्हणून दिला होता. शाहरुख खानचे लंडनमध्येही एक भव्यदिव्य घर आहे, त्याची किंमत आज १७२ कोटी रुपये इतकी आहे.
याशिवाय शाहरुखचे अलिबागमध्ये एक घर देखील आहे. जिथे तो अनेकदा कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करायला जातो. या घराची किंमत 15 कोटी रुपये आहे. शाहरुख खानकडे स्वत:ची व्हॅनिटी कार देखील आहे, त्याची किंमत 4 कोटी रुपये आहे.
शाहरुख खानला लक्झरी कारची खुपच आवड आहे. त्याच्या प्रत्येक कारची किंमत करोडोंच्या आसपास आहे. 4 कोटींची Bentley Continental GT, 14 कोटींची Bugatti Veyron आणि 7 कोटींची Rolls Royce Coupe सारख्या लक्झरी कार त्याच्याकडे आहेत. सोबतच त्याच्याकडे एक Harley Davidson Dyna Street Bob बाइक आहे ज्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये इतकी आहे.
शाहरुख खान देखील एक यशस्वी व्यावसायिक आहे. त्याने स्पोर्ट्सपासून प्रॉडक्शन हाऊसपर्यंत भरपूर पैसे गुंतवले आहेत, त्यातून तो करोडोंची कमाई करत असतो. शाहरुखकडे कोलकाता नाईट रायडर्स नावाची क्रिकेट आयपीएल टीम देखील आहे. या टीमची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 600 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
शाहरुखचे रेड चिलीज एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस असून त्याची सुरुवात पत्नी गौरी खानसोबत केली आहे. या प्रॉडक्शन हाऊसची किंमत जवळपास 500 कोटी रुपये आहे. शाहरुख खानने त्याच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत 'माय नेम इज खान', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'दिलवाले', 'ओम शांती ओम' आणि 'रईस' सारखे अनेक चित्रपट तयार केले आहेत जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.