Laughter Chefs 2: अभिनेत्री मन्नारा चोप्रा ही ‘लाफ्टर शेफ्स – फन विथ फूड’ या रिअॅलिटी शोचा भाग होती. मात्र अलीकडेच तिने या शोमधून अचानक एक्झिट (Exit) घेतली आणि यामुळे तिचे चाहते चकित झाले. या निर्णयामागे नेमके काय कारण होते, यावर तिने स्वतःच स्पष्ट भाष्य करत मौन सोडलं आहे.
मन्नाराने (mannara chopra) सांगितले की, “माझ्यासाठी प्रत्येक सेटवर सन्मान आणि सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे. मी ते कायम राखण्याचा प्रयत्न केला. काही वेळा गोष्टी आपल्या अपेक्षांप्रमाणे घडत नाहीत आणि अशावेळी आपल्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्यावं लागतं.” तिचा इशारा स्पष्टपणे शोच्या सेटवरील वर्तनाकडे होता, जिथे कदाचित तिच्यासोबत आदरयुक्त वागणूक झाली नसावी.
तिने अधिक स्पष्ट करताना सांगितले की, “मी माझी इज्जत राखली. मी कुठल्याही वादात अडकायचं टाळलं. मी कुणाला दोष देत नाही, पण मी माझ्या मापदंडांनुसार निर्णय घेतला.” तिच्या या उत्तरामुळे तिने शांतपणे ठाम भूमिका घेतल्याचं दिसून येतं. शोमधून अचानक बाहेर पडण्यामागे काही अंतर्गत मतभेद असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
‘लाफ्टर शेफ्स २’ (Laughter Chefs 2) या विनोदी आणि जेवणावर आधारित रिअॅलिटी शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. मन्नाराचा या शोमधील प्रवास लहान असला तरी तिने प्रेक्षकांवर छाप पाडली होती. सध्या मन्नारा विविध प्रोजेक्ट्सवर काम करत असून ती लवकरच नव्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.