Shweta Kharat New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zhimmad Song Launch: 'मन झालं बाजिंद' फेम अभिनेत्री 'श्वेता खरात'चं 'झिम्माड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Shweta Kharat New Song: 'मन झालं बाजिंद' फेम अभिनेत्री 'श्वेता खरात'चं 'झिम्माड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

साम टिव्ही ब्युरो

Zhimmad Song Launch: रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी 'ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'झिम्माड' हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात 'मन झालं बाजिंद' फेम 'श्वेता खरात'ने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे.‌

श्वेता सोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका 'स्नेहा महाडीक' हीने हे गाणं गायिले असून या गाण्याचे संगीतकार 'संगम भगत' हे आहेत. तर हे गाणं मनाली घरात हिने लिहीले आहे. 'झिम्माड' गाण्याचे दिग्दर्शन 'अक्षय पाटील' यांनी केले आहे. तर या गाण्याच्या निर्मात्या 'काजल हिवाळे' या आहेत.

अभिनेत्री 'श्वेता खरात' झिम्माड गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, "जेव्हा पहिल्यांदा अक्षयने मला हे गाणं ऐकवलं त्याक्षणी मी गाण्याच्या प्रेमात पडले. मी या गाण्यासाठी लगेच होकार दिला. हे गाणं चिपळूणमध्ये चित्रीत झालं आहे. गाण्यातील लोकेशन्स डोळ्यांचं पारणं फिटवणारे आहेत. टिम फार कमाल होती. गाणं चित्रित करताना खूप धमाल आली. तुम्ही विश्वास ठेवणारं नाही. पण कुठेही धावपळ न होता, या गाण्याचं चित्रीकरण एका दिवसात पार पडले आहे. " (Latest Marathi News)

पुढे ती एका चित्रीकरणाचा किस्सा सांगते, "आम्ही एका धबधब्यापाशी गाण्याचं शूट करत होतो. आणि तो अक्राळविक्राळ धबधबा डोंगराच्या कपारीत होता. जिथे माणसांची वर्दळ नव्हती. खूपचं मोठा धबधबा होता तो. मी सुरूवातीला तिथे जाण्यासाठी घाबरत होते. पण टिमने माझी संपूर्ण काळजी घेतली. माझ्यासोबत गाण्यात एक ज्येष्ठा नावाची लहान मुलगी काम करतेय ती सुद्धा माझ्यासोबत शूटिंग लोकेशनवर आली होती. आम्हाला गाण्याच्या लिरीक्सवर नृत्य करायचं होतं पण, धबधब्याचा आवाज इतका मोठा होता की गाणंच ऐकू येतं नव्हतं. तेव्हा संगीतकार संगम भगतने आमच्यासाठी तिथे गाणं गायलं. आणि आम्ही दोघींनी नृत्य केलं."

या गाण्याचे दिग्दर्शक 'अक्षय पाटील' गाण्याविषयी सांगतात, "मी गेली ५ वर्ष संगीतक्षेत्रात काम करीत आहे. आत्तापर्यंत मी बरेचसे म्युझिक अल्बम केले आहेत. साजणी, गोजिरी, मन माझे, माझी पंढरी, चांदण रातीला, दर्या राजा या गाण्यांचे मी दिग्दर्शन केले आहे. आणि आता झिम्माड हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं चित्रीकरण आम्ही चिपळूण येथे केलं आहे. आम्ही चित्रीकरणाचे लोकेशन्स शोधले आणि ते अतिशय निसर्गरम्य होते. आम्ही जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून या गाण्यावर काम करतोय."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train Video: लोकल ट्रेनमध्ये तरूणीने गायला शिवरायांचा पोवाडा; नेटकरी म्हणाले, 'संस्कार...'

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Krishna Janmashtami 2025: कृष्ण गोकुळाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा वेळ आणि महत्व

Dadar Kautarkhana Rada: दादर कबुतरखान्याजवळ जोरदार राडा, पोलिसांकडून मराठी आंदोलकांना मारहाण; धरपकड सुरू, पाहा VIDEO

Santosh Juvekar: ट्रोलिंगनंतरही संतोष जुवेकर पुन्हा बरळला; म्हणाला- "मी तिकडे बघितलंच नाही, बघूच शकलो नाही..."

SCROLL FOR NEXT