Amit Parab Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amit Parab :ॲक्टिंगमधून ब्रेक, 'हा' मराठमोळा अभिनेता व्यवसायात उतरला; वाचून अभिमान वाटेल

Amit Parab : 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहोचणारा मराठी अभिनेता अमित परबने 'मालवण स्टाईल' या ब्रँडची स्थापना केली आहे. या उपक्रमातून त्याने नवा व्यवसाय सुरु केला आहे.

Shruti Vilas Kadam

Amit Parab : ​मराठी अभिनेता अमित परबने 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं, त्याने अभिनय क्षेत्रातून थोडा ब्रेक घेत कोकणातील अस्सल फळांचे ज्यूस शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'मालवण स्टाईल' या ब्रँडची स्थापना केली आहे. या उपक्रमाद्वारे तो गावातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत आणि शहरातील लोकांना कोकणातील अस्सल चवीचा आनंद देत आहेत. ​

अमित परबने एमबीए केल्यानंतर सात वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले, परंतु अभिनयाची आवड असल्यामुळे त्याने 'मन उडू उडू झालं' या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतरही त्याची आपल्या मातीशी जोडलेले राहण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने कोकणातील अस्सल फळांचे ज्यूस शहरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ​

'मालवण स्टाईल' या ब्रँडच्या माध्यमातून अमित परब याने साखर विरहित ज्यूसची निर्मिती सुरू केली आहे, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनाही कोकणातील फळांचे अस्सल रस चाखता येतील. त्यांनी कोकणात जाऊन उत्पादन संशोधन केले आणि 'मालवण स्टाईल'ची वेबसाइट तयार केली, त्यामुळे ग्राहक थेट खरेदी करू शकतात. ​

अमित परबचा उद्देश कोकणातील स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा आहे. आगामी काळात ते कोकणात बनवलेले आणखी खाद्यपदार्थ ग्राहकांच्या दारात पोहोचवण्याचा मानस बाळगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT