Man Kasturi Re Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Man Kasturi Re: यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या 'मन कस्तुरी रे'चा सुगंध दरवळणार

नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून, यात तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डे प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नवरात्रीत (Shardiya Navratri) जागर केला जातो स्त्रीशक्तीचा, नवरात्रीत केला जातो स्त्रीचा आदर. नवरात्रौत्सवातील नवचैतन्य, जोश, उल्हासमय वातावरणात एका नव्या चित्रपटाची घोषणा मुंबई मुव्हिज स्टुडिओजने केली आहे. हेच सुंदर वातावरण अधिकच बहारदार आणि शानदार करण्यासाठी मुंबई मुव्हिज स्टुडिओज प्रेक्षकांसाठी 'मन कस्तुरी रे'चे नवे पोस्टर (New Marathi Poster Out) घेऊन आले आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने हे पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) झळकले असून, यात तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनय बेर्डे (Abhinay Berde) प्रेमाच्या रंगात दंग होऊन नाचताना दिसत आहेत. संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांकडे कल वाढला आहे. त्याचवेळी तेजस्वी प्रकाशने 'मन कस्तुरी रे' या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर आहेत.

आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघांची कमाल जोडी प्रेक्षकांची सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. पोस्टरवरून ही एक सुंदर प्रेमकहाणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या 'मन कस्तुरी रे' चा सुगंध सर्वत्र दरवळणार, हे नक्की!

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT