Malti Chahar: क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर नुकतीच बिग बॉस १९ मध्ये आली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या घरातील प्रवास आणि इंडस्ट्रीमधील तिच्या प्रवासाबद्दल चर्चा केली. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने कास्टिंग काउचबद्दल एक अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले की एका मोठ्या चित्रपट निर्मात्याने तिला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता.
कास्टिंग काउचबद्दल मालती काय म्हणाली?
सिद्धार्थ कन्नन यांच्याशी एका खास मुलाखतीत मालती म्हणाली, "हो, कास्टिंग काऊचसारखे प्रकार घडले आहे. लोकांनी काही वेळा प्रयत्न केले असतील, पण असे लोक तुम्ही इंटरस्टेड आहात की नाही हे तुमच्या बॉडी लँग्वेजवरुन समजतात. लोक खूप हुशार आहेत. ते तुमचा स्वभाव समजतात. काही लोक माझ्याशी याबद्दल बोलले, एकाने तर अपशब्दही वापरले. माझे वडील वायुसेनेत होते, ते माझ्या बोलण्यावरून दिसून येते. त्यामुळे काही लोक लांब राहतात"
मुलींना जबाबदार धरणे
मालती म्हणाली की इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या सर्व अनावश्यक गोष्टींसाठी मुली जबाबदार आहेत. तिने म्हटले की मुलींनी हे समजलं पाहीजे की पुरुष त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा गैरफायदा घेतात. त्यामुळे मुलींनी त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नये.
दिग्दर्शकाने केला किस करण्याचा प्रयत्न
त्याच संभाषणादरम्यान, मालतीने खुलासा केला की एका लोकप्रिय दिग्दर्शकाने ऑफिसमध्ये तिला किस करण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितले की ती अनेकदा त्याच्यासोबत एका प्रोजेक्टसाठी भेटायची, म्हणून काम संपल्यावर, मालतीने त्याला साईड हग केलं आणि त्या बदल्यात, दिग्दर्शकाने तिचे ओठांवर किस करण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.