Lakshmika Sajeevan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lakshmika Sajeevan Died: साउथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का; २४ वर्षीय अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Malayalam Actress Died : चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मल्ल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन यांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Malayalam Actress Lakshmika Sajeevan Died

चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मल्ल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन यांचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मीकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. अशी माहिती समोर येत आहे.

लक्ष्मीकाने आपल्या उत्तम अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली. अगदी लहान तिने इंडस्ट्रीत नावलौकिक कमावला. अभिनेत्रीच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (Entertainment News)

लक्ष्मीका सजीवन चे शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातील शारजाह येथे निधन झाले. ती शाहजाहमधील बँकेत कामासाठी गेली होती, असे सांगण्यात आले आहे. लक्ष्मीका सजीवनला मल्ल्याळम शॉर्ट फिल्म कक्कामधून ओळख मिळाली. यामध्ये तिने पंचमीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील कामाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते.

लक्ष्मीकाला तिच्या कक्का चित्रपटातील भूमिकेसाठीच ओळकले जाते. लक्ष्मीका सजीवनने 'पुढायम्मा', 'पंचवर्णथा', 'सौदी वेलाक्का', 'उयारे', 'ओरू कुटनादन ब्लॉग', 'ओरू यमंदन प्रेमकथा' आणि 'नित्यहरिथा नायगन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. प्रशांत बी मोल्लिकल दिग्दर्शित 'कून' या चित्रपटात ही अभिनेत्री शेवटची दिसली होती. 'पुढायम्मा' चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेसाठी त्याला लोकांकडून खूप कौतुक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूर-सांगली रोडवर भीषण अपघात; दोन कामगारांचा जागीच मृत्यू

PPF Scheme: सरकारची जबरदस्त योजना! दिवसाला ४१६ रुपये गुंतवा अन् ४१.३५ लाख मिळवा

Manoj Jarange : हे सर्व राहुल गांधीच्या सांगण्यावरून करता का? जरांगे पाटलांचा वडेट्टीवारांना सवाल

मोठी बातमी! निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा; जप्त केलं मोठं घबाड, पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

Kartiki Yatra : विठुरायाचे घेता येणार २४ तास दर्शन; कार्तिकी एकादशीनिमित्ताने मंदिर समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT